पुणे: शादी डॉट कॉम वेबसाईटवरून मुलीशी संपर्क साधून लग्नाचं अमिष दाखवून (Pune Crime News) महिलेची 3 करोड 16 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या तीन आरोपींना पिंपरी- चिंचवडच्या (Pimpri-chinchwad Crime News) सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रणजीत मुन्नालाल यादव, सिकंदर मुन्ना खान आणि बबलू रघुवीर यादव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. फसवणूक झालेल्या महिलेकडून 81 बँक खात्यावर पैसे घेतल्याचे पोलीस तपासात उघड झालं आहे.
नेमकं काय प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उच्चशिक्षित असलेली तरुणी शादी डॉट कॉम संकेतस्थळावरून विवाहासाठी मुलगा शोधत होती. तेव्हा पाहिजे आरोपीची आणि तिची ओळख झाली. परदेशात नामांकित कंपनीत सीईओ असल्याचं सांगितलं. फसवणूक झालेल्या उच्चशिक्षित तरुणाचा देखील विश्वास बसला. त्यांचं व्हाट्सअप कॉल वरून दररोज बोलणं सुरू झालं. ते एकमेकांच्या अधिक जवळ आले. दोघांनी एकमेकांसोबत लग्न करण्याचं ठरवलं होतं, त्यामुळेच याचा फायदा आरोपीने घेतला.
आरोपीने आजारपणाचे आणि लोकांकडून घेतलेल्या कर्ज फेडीचे कारणे देऊन 2023 ते 2024 दरम्यान उच्चशिक्षित तरुणीकडून तब्बल 3 करोड 16 लाख रुपये घेतल्याचे पोलीस तपासात समोर आल. हे करोडो रुपये आरोपीने वेगवेगळ्या 81 बँक खात्यावर घेतले होते. पैकी, 11 अकाउंट हे एकाच पत्त्यावर होते. पैकी हे पैसे ज्या व्यक्तींच्या बँक खात्यात आले, त्या तिघांना पिंपरी- चिंचवडच्या सायबर पोलिसांनी दिल्ली हरियाणा बॉर्डरवरून बेड्या ठोकल्या आहेत. हे तिघे तरुणीची फसवणूक करणाऱ्या आरोपीच्या संपर्कात होते असं पोलीस तापासात समोर आला आहे. तरुणीची फसवणूक करणारा अज्ञात आरोपी आणि बेड्या ठोकण्यात आलेला रणजीत, सिकंदर आणि बबलू हे इंस्टाग्राम कॉलच्या माध्यमातून संपर्कात होते.बबलू हा अज्ञात आरोपीच्या सांगण्यावरून एटीएम मधून पैसे काढून त्याला द्यायचा. या प्रकरणात आत्तापर्यंत 300 ते 400 बँक खात्याची पडताळणी करण्यात आलेली आहे.