पुणे: गेल्या काही दिवसांमध्ये महिलांवर आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत मोठी वाढ झाल्याचं चित्र आहे. अशातच पुण्यात (Pune Crime News) पतीने आपल्या मित्राला आपल्याच बायकोसोबत शारिरीक संबंध ठेवावेत यासाठी घरी आणल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वतः नपुंसक असल्यानेच पतीने पत्नीला मूलबाळ व्हावे आणि आपले पौरुषत्व दिसावे, यासाठी पत्नीसोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी मित्रालाच घरी आणल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातून (Pune Crime News) समोर आला आहे. हा सर्व प्रकार पतीच्या मित्राने तक्रारदार महिलेला फोन करून सांगितल्यानंतर उघडकीस आल्याचा आरोप फिर्यादीतून केला आहे.(Pune Crime News)
नेमकं काय घडलं?
याप्रकरणी विवाहीत महिलेने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह त्यांच्या मित्रावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आली आहे. पोलिसात दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, पीडित महिला ही पुण्यातील असून, पती हा सांगलीचा आहे. तोही सध्या पुण्यातच (Pune Crime News) स्थायिक आहे. सांगलीत नवऱ्याच्या घरी राहत असताना पतीमध्ये आणि तिच्यामध्ये वारंवार वाद होत होते. त्यातून तो तिला मारहाण देखील करत होता. सहा महिन्यांपूर्वी महिला तिच्या माहेरी निघून आली होती. (Pune Crime News)
पती त्याच्या मित्राला घरी घेऊन आला अन्...
जुलै 2023 मध्ये दोघे एकत्र राहत असताना `पती त्याच्या मित्राला घरी घेऊन आला आणि म्हणाला तो इथेच राहणार आहे. त्यासाठी जेवण बनवण्यास सांगितलं. पण, त्या रात्री तो त्या विवाहीत महिलेकडे वेगळ्या नजरेने पाहत होता. हे तिने पतीला सांगितलं. याच कारणावरून पतीने तिला शिवीगाळ केली. त्या वेळी महिला माहेरी निघून आली. 17 फेब्रुवारी 2025 रोजी पतीच्या त्या मित्राचे महिलेला वारंवार मेसेज येऊ तिने दुर्लक्ष केले.
परंतु, त्यानंतर त्याचा 1 मार्च रोजी या विवाहीत महिलेच्या मोबाईलवर फोन आला. या वेळी त्याने तिला फोनवर त्या रात्रीबद्दलचं धक्कादायक सत्य सांगितलं. तो म्हणाला, तुझ्या पतीने मला तुझ्याकडे शरीर संबंधासाठी येण्यासाठी सांगितलं होतं. त्याचबरोबर , तुझ्या पतीचा लैंगिक प्रॉब्लेम असल्याचेही त्याने तिला सांगितलं. त्याने मला तुझ्याकडे तो नपुंसक असल्यानेच व मूलबाळ व्हावे, या कारणामुळं शरीरसंबंध ठेवण्यासाठी आणल्याची धक्कादायक माहिती दिली. त्यानंतर महिलेने पती आणि त्याच्या मित्राविरोधात तक्रार दिली आहे.