पुणे: पुणे सायबर पोलिसांनी (Crime News) तब्बल 2 कोटी 46 लाख रुपयांच्या फसवणुकीचा पर्दाफाश करत मुख्य आरोपीला हैद्राबादमधून अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव सितैया किलारु (वय 34, रा. याप्रल, हैद्राबाद) असे असून, त्याने IIT मुंबईच्या प्राध्यापकाचे नाव वापरून पुण्यातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयाला AI व ड्रोन प्रकल्प मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. या खोट्या आश्वासनाच्या आडून मोठ्या रकमेची फसवणूक करण्यात आली होती. सायबर पोलिसांनी या उच्चशिक्षित आरोपीला हैदराबादमध्ये बेड्या ठोकल्या आहेत. शासनाने मंजूर केलेल्या एआय आणि ड्रोन रिसर्च प्रकल्प देण्यासाठी फंडिंग प्रकल्पासाठी 2 टक्के रक्कम भरावी लागेल सांगितलं, विद्यापीठाचा विश्वास जिंकला आणि विद्यापीठालाच गंडवलं.

Continues below advertisement

Pune Crime News: एआय व ड्रोन रिसर्च प्रकल्प देण्यासाठी फंडिंग...

हैदराबादमधील सितैया सिलारु या उच्चशिक्षित 34 वर्षीय तरुणाने पुण्यातील खासगी विद्यापीठाला तब्बल दोन कोटींचा गंडा घातल्याचा प्रकार सोमर आला आहे. हा तरुन लंडनहून शिकून आलेला आहे,पीएचडी आणि युपीएससी पास झालेला आहे. तरीही त्यानं विद्यापीठाला वेगळी शक्कल लढवत गंडा घातला. विद्यापीठाच्या शैक्षणिक अधिकाऱ्याला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माजी कुलगुरुच्या नावाने मेसेज केला. त्यात आयआयटी मुंबईतील प्राध्यापक डॉ. चेतन कामत यांचा नंबर देण्यात आला होता. शासनाने मंजूर केलेल्या एआय व ड्रोन रिसर्च प्रकल्प देण्यासाठी फंडिंग प्रकल्पासाठी 2 टक्के रक्कम भरावी लागेल. यावर विश्वास ठेवून विद्यापीठाने थेट 2 कोटी 46 लाख रुपये भरले, मात्र ज्यावेळी त्याला करारासाठी बोलवलं त्यावेळी मात्र तो फरार झाला. त्यानंतर हा प्रकार समोर आला. 

Pune Crime News:  50 लाखांचा मुद्देमाल जप्त

हा  प्रकार समोर आल्यानंतर पुणे सायबर पोलिसांनी त्याचा माग काढला. हे सगळे पैसे त्याने त्याच्या स्वत:च्या खात्यावर घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी त्याला थेट हैदराबाद गाठून बेड्या ठोकल्या. सितैया किलारु याला बेटींगचा नाद होता. त्यामुळे त्याचं कुटुंबानेही त्याला सोडलं आहे. पोलिसांनी दोन खात्यातील  29 लाख गोठविले असून 10 डेबिट कार्ड, 12 पासबुक, सोने खरेदीच्या पावत्या, चार मोबाईल, टॅब, लॅपटॉप, दागिने, दोन कार असा 50 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

Continues below advertisement

Pune Crime News: अनेक वर्षे प्राध्यापक म्हणून काम 

आरोपी उच्चशिक्षित असून यूकेमधून पीएच.डी. केलेली आहे. त्याने अनेक वर्षे प्राध्यापक म्हणून काम केल्याची माहिती आहे, त्याने UPSC पूर्व व मुख्य परीक्षा देखील उत्तीर्ण झाल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. मात्र गेल्या काही वर्षांत त्याने अशा प्रकारच्या फसवणुकीचे कारस्थान रचले असून त्याच्यावर तेलंगणातील विविध ठाण्यांत यापूर्वीही अनेक गुन्हे नोंद असल्याची माहिती समोर आली आहे.

Pune Crime News: सितैया किलारु कोण आहे?

-आरोपी मूळचा विजयवाडा येथील 2010 मध्ये ई. एन. टी. सी. इंजिनिअर -2010 ते 2014 स्टँडफोर्ड युनिव्हसिटी लंडन, यू. के. येथे मास्टर डिग्री,ब्रिमिंगहम युनिव्हर्सिटी लंडन येथून पीएच. डी.-2015-16 हैदराबाद येथील कोनेरू विद्यापीठात नोकरी-2016 ते 18 बीआरआयटी विद्यापीठात नोकरी-2019 व 2020 यूपीएससी पूर्व व मुख्य परीक्षा पास