Pune Crime News: पुण्यात कचरा वेचक तरुणावर पहाटेच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली आहे. पुण्यातील चंदन नगर जवळील खराडी परिसरात पहाटे ही घटना घडल्याने सगळ्या परिसरात खळबळ उडाली आहे. खराडीतील एकनाथ पठारे या वस्तीत राहणारा तरुण पहाटेच्या सुमारास कमाला जात असताना दोन अज्ञात तरुणांची त्याचा पाठलाग करत त्यांच्या भर रस्त्यात गोळीबार केला. गोळीबार केल्यावर दोघे अज्ञात तरुण फरार झाले आहेत.


27 वर्षीय अक्षय प्रकाश भीसे असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव असून तो पुणे महापालिकेत कचरा वेचायचं काम करायचा. रोज प्रमाणे ते सकाळी कामासाठी निघाला होता. डम्पिंग स्टेशनकडे जात असताना त्याच्यावर अज्ञात तरुणांनी हल्ला केला. शेजाअक्षया मृत्यू झाला होता. या प्रकरणी चंदन नगर पोलिस ठाण्यातील पोलीस तपास करत आहे.


महिलेची केली हत्या
पिंपरी-चिंचवडमध्ये दुकान मालक असलेल्या महिलेचा गळा चिरून खून करण्यात आला होता. ही घटना पिंपरी-चिंचवडच्या भोसरी परिसरात घडली होती. पूजा देवी प्रसाद असे मृत महिलेचे नाव आहे. पूजाचे ‘प्रगती कलेक्शन’ नावाचे दुकान होते. याच दुकानात ही घटना घडली. खून करु आरोपी पसार झाला आहे. 



पूर्ववैमनस्यातून एका व्यक्तीचा खून
पुण्याच्या (pune) बावधन परिसरात पूर्ववैमनस्यातून एका व्यक्तीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती. पीतबसा कमलचंद जानी असं खून झालेल्या व्यक्तीचे नाव होतं. याप्रकरणी प्रदीप बलभीम राजोळे, आकाश कांबळे, आकाश पवार यांच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. रविवारच्या रात्री आठच्या सुमारास पीतबसा यांच्यावर कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. त्यांच्या डोक्यात, हातावर वार करण्यात आलेत. आरोपी फरार असून त्यांचा शोध हिंजवडी पोलीस घेत होते.


पीतबसा कमलचंद जानी यांचा पूर्ववैमनस्यातून खून करण्यात आला होोता. पुण्यातील बावधन परिसरात या खूनामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. या सगळ्यात जुने वाद टोकाला गेल्याने खून केल्याचं स्पष्ट झालं होतं. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.