Pune Crime News : मैत्रिणीसोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाचा चाकूने (pune Crime) वार करुन हत्या (murder) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील (pune) सहकारनगरमधील (Sahakar nagar Pune) तळजाई टेकडीजवळ ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. गुरुवारी (8 डिसेंबर) सायंकाळी मित्र आणि मैत्रिणीसोबत तळजाई टेकडी परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाचा चाकूने वार करुन हत्या करण्यात आली. साहिल कसबे (वय 19 वर्षे) असे खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. सहकारनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेला साहिल हा गुरुवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास काही मित्र आणि मैत्रिणी सोबत तळजाई टेकडी परिसरात फिरण्यासाठी गेला होता. टेकडीवर साहिल हा मैत्रिणीसोबत बसला असताना तीन आरोपी त्या ठिकाणी आले. दुसऱ्यांच्या मैत्रिणी सोबत कशाला फिरत असतोस असे म्हणून आरोपींनी त्याच्यासोबत वाद घातला. आधी त्याला लाकडी बांबूने मारहाण केली. तर एका आरोपीने चाकूने त्याच्या मानेवर, पोटावर आणि डोक्यावर सपासप वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या साहिल याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सहकारनगर पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यातील दोन आरोपींची नावे देखील निष्पन्न झाली आहेत. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
पुण्यात गुन्हेगारी संपता संपेना
आजच (9 डिसेंबर) घडलेल्या दुसऱ्या घटनेत पाच जणांच्या टोळीने तरुणावर जीवघेणा हल्ला केला आहे. तू माझ्या मित्राचा मर्डर केला, मी तुला जिवंत सोडणार नाही तुझी विकेटच पाडतो, असं म्हणत टोळीने हल्ला केला. पुण्यातील हडपसर परिसरातील म्हाडा वसाहतीत हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे आणि एक पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. शुभम शरद भंडारी याने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तक्रारदार आणि टोळीतील मुलं एकमेकांच्या ओळखीचे आहेत. तक्रारदार बाहेर जात असताना टोळीने कोयत्याने पाठीवर हल्ला केला. हा हल्ला तक्रारदार शेजारच्या घरात शिरला. तो बाहेर निघताच त्याचा पाठलाग केला. त्याला शिवीगाळ केली आणि पाचही जण मिळून त्याच्यावर हल्ला केला. या सगळ्या प्रकरणाचा पोलीस सखोल तपास करत आहेत.