Pune Crime News: पुण्यातील (Pune crime) नदीपात्रात 35 वर्षीय व्यक्तीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नदीपात्रातील भिडेपुलाजवळ (Bhide Bridge) मृतदेह सापडला असून मृत व्यक्तीच्या गळ्यावर धारदार शस्त्रांनी वार करुन हत्या (Murder) करण्याल आली. या घटनेमुळे डेक्कन परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पुणे शहराची मध्यवस्ती असलेल्या भिडे पुलावर ही घटना घडल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे.
मृतदेहाची ओळख पटली असून गणेश सुरेश कदम असं या मृत व्यक्तीचं नाव आहे. ते शनिवार पेठ परिसरातील रहिवासी आहेत. आज सव्वा दोनच्या सुमारात ही घटना समोर आली. पोलिसांना मृतदेह सापडल्याची माहिती कळताच डेक्कन पोलिसांनी नदीपात्रात धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा केला. या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.
गणेश कदम यांच्या लॉंन्ड्रीचा व्यावसाय आहे. त्याचं शनिवार पेठेच लॉंड्रीचे दुकान आहे. रविवारी संध्याकाळी एक फोन आल्यानंतर गणेश घरातून बाहेर पडले. मात्र रात्रभर घरात परतलेच नाही. त्यानंतर शोधाशोध सुरु झाली मात्र त्यांचा मृतदेह नदीपात्रास सापडला. पूर्ववैमस्यातून हत्या केल्याची शंका व्यक्त केली आहे. हत्या करुन पुरावा नष्ट करण्यासाठी हा मृतदेह नदीपात्रात फेकून दिला असावा,असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास डेक्कन पोलीस करत आहेत.
हत्येचं सत्र कधी संपणार?
पुण्यात वादावरुन, पूर्ववैमनस्यातून हत्या केल्याच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वीत नातीने आजीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला होता. अॅपवरून घेण्यात आलेल्या कर्जामुळे नातीने टोकाचे पाऊल उचलले होते. अॅपवरुन घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी नातीनेच आजीची हत्या (murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. पुण्यातील वारजे परिसरात ही घटना घडली होती. सुलोचना सुभाष डांगे असं 70 वर्षीय हत्या झालेल्या आजीचं नाव होतं. या घटनेमुळे वारजेतील आकाशनगर परिसर हादरलं होतं. लोन अॅपवरुन (Loan App) गौरी डांगे या नातीने कर्ज घेतले होते. कर्ज फेडण्यासाठी तिला तगादा लावण्यात आला होता. सायबर चोरांकडून कर्जाच्या रक्कमेसाठी धमकी देण्यात येत होती. कर्जाची रक्कम फेडण्यासाठी आरोपी गौरीने आजीची हत्या करत घरातून आजीचे एक तोळ्याचे मंगळसूत्र आणि 36 हजार रोख रक्कम चोरले. आरोपी गौरीने 20 हजार रुपयांना मंगळसूत्र विकले आणि त्यातील 13 हजार रुपये धमकी देणाऱ्यांच्या खात्यावर जमा केले. या हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांना चौकशी दरम्यान गौरीवर संशय आला होता. पोलिसांनी गौरीची चौकशी केल्यानंतर तिने हत्या केल्याची कबुली दिली होती.