पुणे: सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यामध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पुण्यात 73 वर्षीय वृद्धाकडून क्लिनिकमध्ये रिसेप्शनिस्ट तरुणीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. क्लिनिकमध्ये एकटीला पाहून पप्पी दे म्हणत रिसेप्शनिस्ट तरुणीचा लज्जा उपस्थित केली. या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील विश्रामबाग रोड परिसरातील एका खाजगी क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या 27 वर्षीय रिसेप्शनिस्ट तरुणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली, या घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. 

73 वर्षीय वृद्धाने एकट्या असलेल्या तरुणीशी अश्लील वर्तन केल्याचा आरोप त्या तरूणीने केला आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. 3 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घटना घडली आहे. क्लिनिकमध्ये 73 वर्षीय सुरेशचंद चोरडिया नावाचा वृद्ध रुग्ण म्हणून आला होता, क्लिनिकमध्ये त्या दिवशी रिसेप्शनवर एकटीच तरुणी उपस्थित होती. ही संधी साधत आरोपीने तिच्याशी अश्लील वर्तन सुरू केले. त्याने अचानक रिसेप्शनिस्टच्या गालाला हात लावत "पप्पी दे" अशी मागणी केली. यानंतर खिशाकडे हात दाखवत म्हणाला, "माझ्याकडे पैसे आहेत, तुला हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जातो, तुला जे हवे ते मी देतो, पण तू मला पाहिजे ते कर. तरुणी घाबरून क्लिनिकमधून पळाली. या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने तात्काळ क्लिनिक सोडलं आणि बाहेर पळ काढला. मात्र वृद्धाने तिला पाठलाग करत, "उद्या क्लिनिकमध्ये आहेस का?" असा प्रश्न विचारत तिला त्रास दिला.

तुला जे हवे ते मी देतो पण...

मिळालेल्या माहितीनुसार, 73 वर्षीय वृद्धाने एकट्या असलेल्या तरुणीशी अश्लील वर्तन केल्याचा आरोप तरूणीने केला आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. शहरातील एका खासगी क्लिनिकमध्ये 3 जुलै रोजी सायंकाळी घडलेल्या घटनेने खळबळ उडवली आहे. 73 वर्षीय वृद्ध रुग्णाने रिसेप्शनवर एकटी उपस्थित असलेल्या तरुणीशी अश्लील वर्तन करत त्रास दिला, असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित तरुणीने धाडसाने याबाबत तक्रार दिली असून, पोलीस तपास सुरू आहे. ही घटना सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली. सुरेशचंद चोरडिया (वय 73) असे आरोपी वृद्धाचे नाव असून, ते त्या दिवशी रुग्ण म्हणून क्लिनिकमध्ये आले होते. यावेळी क्लिनिकमध्ये केवळ रिसेप्शनिस्ट तरुणीच उपस्थित होती. हीच संधी साधून चोरडिया यांनी तिच्याशी अश्लील वर्तन सुरू केल्याचे समजते.

ते रिसेप्शनवर आले आणि थेट तरुणीच्या गालाला हात लावत “पप्पी दे” अशी मागणी केली. त्यानंतर खिशाकडे हात दाखवत, “माझ्याकडे पैसे आहेत, तुला हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जातो. तुला जे हवं ते देतो, पण तू मला पाहिजे ते कर”, असे म्हणत तिला मानसिक त्रास दिला. या अनपेक्षित आणि अश्लील प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने तात्काळ क्लिनिक सोडले आणि बाहेर पळून गेली. मात्र, आरोपी वृद्धाने तिचा पाठलाग करत “उद्या क्लिनिकमध्ये आहेस का?” असा प्रश्न विचारून तिला पुन्हा धमकावण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे मानसिक धक्का बसलेल्या तरुणीने तिथून पळ काढला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, आरोपी वृद्धावर संबंधित कलमांखाली कारवाई होणार आहे.