Pune Crime : पुण्यातील (Pune) मध्यवर्ती आणि नेहमी गजबजलेल्या भवानी पेठ (Bhavani Peth) भागात केवळ गाडीचा हॉर्न वाजवण्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन गटांमध्ये कपडे फाटेपर्यंत फ्री-स्टाईल हाणामारी झाली. दुचाकीस्वाराने रस्ता ओलांडणाऱ्या एका पादचार्‍याला हॉर्न दिला आणि या किरकोळ घटनेने काही क्षणांतच हिंसक रूप करत दोन गटामध्ये तूफान हाणामारी झाली. 

या मिळलेल्या माहितीनुसार, भवानी पेठेतून दुचाकीवरून जात असलेल्या तरुणाने समोरून रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तीला हॉर्न दिला. या हॉर्नचा राग मनात धरून संबंधित व्यक्तीने दुचाकीस्वाराशी वाद घातला. यानंतर दोन गटात कपडे फाटेपर्यंत फ्री-स्टाईल हाणामारी झाली. रस्त्यावर चालू असलेल्या या हाणामारीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.  

खडक पोलिसांकडून एका आरोपीला अटक

घटनेची माहिती मिळताच खडक पोलीस ठाण्याच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे. दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी केवळ हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून असा हिंसाचार होणे, हे गंभीर बाब मानली जात असून पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस काय उपाययोजना राबवणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

टोळक्याकडून तिघांवर धारदार शस्त्राने वार

दरम्यान, उसने पैसे दिलेल्या व्यक्तीबाबत विचारणा केल्याच्या कारणावरून टोळक्याने तिघांवर धारदार शस्त्राने वार करून त्यांचा जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही गंभीर घटना सोमवारी (दि. 28) पहाटे सुमारे एकच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावरील कवडीपाट टोलनाका परिसरात, गुलमोहर लॉन्सच्या समोर घडली. या प्रकरणी सुरज प्रशांत वाघमारे (वय 16, रा. गोपाळपट्टी, मांजरी बुद्रुक, ता. हवेली) याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हल्ल्यात शंकर सुनील कदम, शाहीद लाजुदिदन शेख, आणि सर्वेश संभाजी काळे (सर्व वय 17, रा. गोपाळपट्टी, मांजरी, ता. हवेली) हे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणात प्रेम (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) आणि त्याच्यासोबत असलेल्या इतर पाच जणांविरुद्ध लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Pahalgam Attack: राजकारण्यांनी आमच्या भावनांशी खेळू नये, आम्ही मूर्तिमंत दहशतवाद पाहिलाय; संतोष जगदाळेंच्या पत्नीची आर्त विनंती

Pune Crime : पुणे पोलिसांकडून बनावट नोटा छापण्याचं मोठं रॅकेट उद्ध्वस्त; 28 लाखांच्या कोऱ्याकरकरीत 500 अन् 200 च्या नोटा जप्त