पुणे : लॉकडाऊन दरम्यान पुण्यात नागरिकांना ई पास संदर्भात अनेक अडचणी येत आहेत. लॉकडाऊनमध्ये आंतरजिल्हा प्रवासासाठी गेल्या 17 दिवसांमध्ये 1 लाख 5 हजार 744 पुणेकरांनी ई-पास मिळवण्यासाठी पोलीसांकडे अर्ज केले होते. त्यापैकी 27 हजार 592 जणांचे ई-पास मंजूर केले आहेत. तर तब्बल 57 हजार 99 जणांचे अर्ज फेटाळले आहेत. यावर पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ट्वीट करत दिलासादायक माहिती दिली आहे. 


पोलीस आयुक्तांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, "ई पासबाबत नागरिकांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आपण ई पाससाठी अर्ज केला असेल. ज्यामध्ये पेंडिंग किंवा रिजेक्टेड असं दाखवलं जात असेल तर आपण या ट्वीट खाली तुमची माहिती कमेंट करा आणि माझ्या लक्षात आणून द्या. आम्ही अर्जाचे पुनरावलोकन करु."