पुणे : पुण्यामध्ये घराला लागलेल्या आगीत होरपळून दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे, तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातल्या पिंपळगावमध्ये शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली.


एकनाथ शिंदे आणि सुनिता शिंदे असं आगीत होरपळून मृत पावलेल्या पती-पत्नीचं नाव आहे. तर त्यांचा मुलगा रविंद्र शिंदे आगीत गंभीर जखमी झाला आहे. रविंद्र यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मध्यरात्री शिंदे कुटुंब झोपेत असल्याने आग लागल्याचं न समजल्याची शक्यता आहे. दौंड पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.