पुणे: निवडणुकीच्या तोंडावर पुणे महापालिकेनं विकास नियंत्रण नियमावली म्हणजेच डीसी रुल जाहीर केलं आलं आहे. पालिका प्रशासनानं जाहीर केलेल्या नियमावलीत बिल्डरांना वाढीव एफएसआय तर पेठांमधील जुन्या वाड्यामध्ये राहणाऱ्या भाडेकरुंना 279 चौरस मीटर घरं देण्याचं गाजर दाखवण्यात आलं आहे.
मेट्रो मार्गापासून 30 मीटर अंतरापर्यंत चार एफएसआय देण्यात येणार आहे. पुण्यातल्या अनेक पर्यावरणवादी संस्थांनी याला विरोध केला आहे. या निर्णयानं शहराच्या मध्यवर्ती भागात उत्तुंग इमारती उभ्या राहतील आणि त्यामुळे बकालपणा वाढेल असं या संस्थांचं म्हणणं आहे.
दरम्यान, हा आराखडा 5 जानेवारी रोजीच मंजूर झाला असून आज जाहीर करण्यात आला आहे.
विकास नियंत्रण नियमावलीतील काही महत्वाचे मुद्दे
*जुन्या आणि नविन हद्दीला एकच नियमावली.
*पार्किंग, सार्वजनिक स्वछतागृहासाठी अतिरिक्त एफ एस आय.
*मेट्रोच्या परिसरात 30 मीटर रस्त्यावर 4 एफएसआय
*मोठ्या सोसायटींना ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया, रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक
*जुन्या वाडयाच्या पुनर्विकासात भाडेकरुना मोफत 279 चौ.मी.चे मोफत घर. 50 टक्के एफएसआय मोफत देणार.