पुणे : पुणे म्हटलं की इतरांना दुपारी 1 ते 4 या वेळेत बंद असणारी दुकानंच डोळ्यासमोर येतात. मात्र 1 जुलै 2017 हा दिवस पुणेकरांसाठी ऐतिहासिक म्हणावा लागेल. चितळेंचं दुकान यापुढे दुपारी 1 ते 4 या वेळेतही सुरु राहणार आहे.


ग्राहकांच्या सेवेसाठी पुण्यातील डेक्कन परिसरातील चितळ्यांचं दुकान आता दुपारीही सुरु ठेवण्यात येणार आहे. चितळे बंधूंच्या व्यवसायाला 75 वर्षे पूर्ण झाल्यानंतर ठाण्यातील एका कार्यक्रमात चितळेंनी याबाबतची माहिती दिली होती, त्यानुसार आता ही सेवा दुपारीही सुरु ठेवण्यात येणार आहे

जीएसटी लागू होताच चितळेंच्या दुकानातली बाकरवडी मात्र महागली आहे. बाकरवडीची किंमत 20 रुपयांनी महागली असून आता 280 ऐवजी 300 रुपये किलोने मिळणार आहे.