पुणे : पालकमंत्रिपद अजित पवारांकडे गेल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. आज पुण्यात तातडीची बैठ आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलणं अपेक्षित होतं. त्यावेळी त्यांनी माध्यमांवर आणि पत्रकारांवर कोणताही राग नाही, असं म्हणत पालकमंत्रीपदावर प्रतिक्रिया देणं टाळलं. त्यांच्या या कृतीतून ते नाराज आहे का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 


पुण्याचे पालकमंत्रीपद अजित पवारांकडे (Ajit Pawar) सोपवण्यात आल्यानंतर मावळते पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याकडून बुधवारी रात्री उशीरा पालकमंत्री म्हणून गुरुवारी जिल्हा वार्षिक योजना आढावा बैठकीचा निरोप देऊन बैठक घेण्यात आली. अजित पवार शुक्रवारी पुण्यात येऊन जिल्हा नियोजनाची बैठक घेण्याची शक्यता असताना एक दिवस आधी चंद्रकांत पाटील यांनी काहीशा वेगळ्या नावाने ही बैठक बोलावल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे आणि या बैठकीची चर्चाही होत आहे.


अजित पवारांच्या नेतृत्वाखाली उद्या (6 ऑक्टोबर) होण्याची शक्यता असलेल्या बैठकीला जिल्हा नियोजन बैठक, असं नाव असेल तर चंद्रकांत पाटील यांनी आज बोलावलेल्या बैठकीला 'जिल्हा वार्षिक योजना कामकाज आढावा बैठक', असं नाव देण्यात आलं. या बैठकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघातील विकास निधीबाबत चर्चा झाली. 


चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री म्हणून मंजूर केलेल्या 400 कोटी रुपयांचा विकासनिधी अजित पवारांनी अर्थमंत्री बनताच अडकवून ठेवला होता. मात्र अजित पवार समर्थक आमदारांना प्रत्येकी दहा कोटी रुपयांचा विकासनिधी ग्रामीण विकास निधी आणि समाजकल्याण विभागाचा प्रत्येकी पाच कोटी निधी मंजूर करण्यात आला होता.  त्यामुळे चंद्रकांत पाटील आणि भाजपकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. 


चंद्रकांत पाटीलच आमचे नेते...


पुण्याचे पालकमंत्रीपदावरुन चंद्रकांत पाटील यांची उचलबांगडी करुन अजित पवारांकडे पुण्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आता पुण्यात भाजप नेत्यांची अडचण होण्याची शक्यता आहे. पुण्यात अनेक भाजनेत्यांची चंद्रकांत पाटील यांनाच आपला नेता असं म्हटलं आहे. अजित पवारांना पालकमंत्री करणं हे चांगलं आहे. पक्षाच्या निर्णयाशी आम्ही सहमत आहोत. मात्र आमचा नेता चंद्रकांत पाटीलच असेल. येत्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांना समोर ठेवून पक्षश्रेष्ठींनी हा निर्णय घेतला आहे, असं पुणे भाजप अध्यक्ष धीरज घाटे यांनी सांगितलं आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Pune Ajit Pawar : अजितदादा पालकमंत्री झाल्याने पुण्यातील भाजप नेत्यांची अडचण होणार?