Pune Bypoll election :  पुणे जिल्ह्यातील कसबा (Pune Bypoll Election) (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या दोन्ही ठिकाणी मतदानाला सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या निमित्तानं दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कसबा आणि चिंचवडमध्ये दोन्ही मतदार संघात नागरिकांनी सकाळी लवकर जाऊन मतदान केलं. त्यात अनेक ज्येष्ठ नागरिकांचाही सामवेश होता. 


सकळी 7 वाजता दोन्ही मतदार संघात मतदानाला सुरुवात झाली अनेक मतदान केंद्रात नागरीकांच्या स्वागतासाठी रांगोळ्यांच्या पायघड्या आणि गुलाबांचे फुल देऊन मतदारांचं स्वागत करण्यात आलं. त्यासोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी मतदान केंद्रावर व्हिलचेअरचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे. ज्येष्ठांनी सकाळी लवकर मतदान करुन आपला मतदानाचा हक्क बजावला.


मतदानाला गालबोट...


माजी नगरसेवक सागर अंघोळकर आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचे समर्थक यांच्यामध्ये हाणामारी झाली आहे. पिंपळ गुरव माध्यमिक विद्यालय मतदान केंद्राबाहेर ही झटापट झाली. हा सगळा प्रकार पाहून पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.  भाजपच्या उमेदवार अश्विनी जगतापांनी मतदान केलं.  केंद्रावरच वाद झाल्याने खळबळ उडली आहे.  मतदान केंद्रावर थांबण्यावरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. 


चिंचवडमध्ये 11 वाजेपर्यंत 10.45 टक्के मतदान


चिंचवड विधानसभा मतदार संघात मतदान सुरु आहे. या मतदार संघामध्ये एकूण 5 लाख 68 हजार 954 मतदार असून 510 मतदार केंद्रावर मतदान होत आहे. सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत झालेल्या एकूण मतदानाची टक्केवारी 3.52% तर 11 वाजेपर्यंत 10.45 टक्के मतदान झालं. 


कसब्यात 11 वाजेपर्यंत 8.2 टक्के मतदान


कसबा मतदार संघात 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळी 9:30 वाजेपर्यंत कसब्यात 6.5 टक्के मतदान झालं. तर सकाळी 11 वाजेपर्यंत 8.2 टक्के मतदान झालं. या मतदार संघातील मतदान केंद्रावर मतदारांच्या मोठ्या रांगाच रांगा बघायला मिळाल्या.



कोणकोणत्या नेते, उमेदवारांनी केलं मतदान?


कसबा आणि चिंचवड मतदार संघातील उमेदवार यांनीदेखील सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. कसब्यातील कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर, भाजपचे उमेदवार हेमंत रासने चिंचवडच्या भाजप उमेदवार अश्विनी जगताप, राष्ट्रवादीेचे उमेदवार नाना काटे आणि अपक्ष आणि सगळ्यात चर्चेत राहिलेले उमेदवार राहुल कलाटे यांनीदेखील मतदानाचा हक्क बजावला. प्रत्येकवेळी मत लक्ष्मण जगताप याना द्यायचे मात्र यावेळी स्वत:लाच द्वायवं लागलं. आज त्यांची उणीव भासत आहे, अशा भावना चिंचवडच्या भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांनी व्यक्त केल्या तर बाकी उमेदवारांनी आमचाच विजय होणार, असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यासोबतच खासदार श्रीरंग बारणे यांनीदेखील मदानाचा हक्क बजावला.