Pune Bypoll election : पुण्यातील कसबा आणि चिंचवड मतदार (Pune Bypoll Election)  संघाच्या पोटनिवडणुकीसाठीचा प्राचाराचा शेवटचा आठवडा आहे. त्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजपकडून प्रचासासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. कसब्यातील भाजप उमेदवार हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे कॉंंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्यासाठी कसब्यात  दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून प्रचार यात्रा सुरू आहे. त्यासोबतच चिंचवड मतदार संघात तिरंगी लढत होणार आहे. भाजपकडून अश्विनी जगताप, महाविकास आघाडीकडून नाना काटे आणि अपक्षा उमेदवार राहुल कलाटे यांंच्यात ही लढत होणार आहे. चिंचवडच्या या तिरंगी लढतीततही सर्वपक्षीयांकडून प्रचार सुरू आहे. आज शिवसेना नेते आदित्य ठाकरे, सुषमा अंधारे, भाजप नेत्या चित्रा वाघ, खासदार उदयनराजे भोसले उपस्थित असणार आहेत. 


भाजपकडून कसब्याचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी भाजपकडून 40 स्टार प्रचारकाची यादी तयार करण्यात आली होती. त्या स्टार प्रचारकांपैकी अनेक नेते रोज मतदार संघात प्रचारासाठी मैदानात उतरत आहेत. त्यामुळे कसब्यात भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे. काल (21 फेब्रुवारी) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्यांंच्यासोबतच अनेक स्थानिक नेतेही प्रचारासाठी मतदार संघात रोड शो आणि कोपरा सभा घेत आहेत. आज खासदार उदयनराजे भोसले, भाजपनेत्या चित्रा वाघ त्यांच्यासोबतच स्थानिक नेतेही उपस्थित असणार आहे. त्यांच्या विरोधात उभे असलेले महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर यांच्य प्रचारासाठीदेखील यशवंत ठाकरे , वंदना चव्हान, सुषमा अंधारे उपस्थित असणार आहे.


तिकडे चिंचवडमध्ये तिरंगी लढत आहे. त्यामुळे या मतदार संघाकडे सर्वपक्षीय नेत्यांचं लक्ष लागलं आहे. सर्वपक्षीयांकडून या मतदार संघाच्या प्रचारासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे. महाविकास आघाडीकडून वरिष्ठ नेत्यांपासून ते तरुण नेत्यांपर्यंत सर्वच नेते या निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. आमदार रोहित पवार, नाना पटोले, अजित पवार हे मैदानात उतरले आहेत. त्यासोबतच भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्यासाठी भाजपचे नेते जोमाने प्रचार यात्रेत उतरले आहेत. भाजपकडून पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, रविंद्र चव्हाण, गिरीश महाजन प्रचारासाठी तळ ठोकून आहेत.


महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी आज थेट शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि विरोधीपक्षनेते अजित पवार यांचा आज रोड शो आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे चिंचवड आणि कसब्यात प्रचाराचा धुरळा सुरू आहे. दोन्ही पक्षांकडून कस लावण्यात येत आहे. येत्या 26 फेब्रुवारीला या दोन्ही मतदार संघासाठी मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीच्या रिंगणात कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.