Pune Bypoll Election : कसबा आणि चिंचवड ( Kasba and Chinchwad) विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमुळं पुण्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना होत आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दोन्ही मतदारसंघात बडे नेते प्रचाराच्या मैदानात उतरल्याचं चित्र दिसत आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे चिंचवड आणि कसबा या दोन्ही मतदारसंघात प्रचारासाठी येणार आहेत. तर उद्या (23 फेब्रुवारी) युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे कसबा मतदारसंघात प्रचारासाठी येणार आहेत. 


Sharad Pawar : कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मैदानात शरद पवार 


पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मैदानात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उतरले आहेत. त्यांनी दिवसाची सुरुवात चिंचवड विधानसभेच्या बैठकांनी केली आहे. त्यानंतर ते पत्रकार परिषदही घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते नेमकं काय बोलतात याकडे भाजपचे लक्ष लागलं आहे. त्यानंतर दीड वाजेपर्यंत आणखी तीन ठिकाणी बैठका शरद पवार घेणार आहेत. तर सायंकाळच्या सत्रात त्यांचा मोर्चा कसबा विधानसभेकडे वळणार आहे. नाना काटे हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून चिंचवड मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. तर भाजपकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप निवडणूक लढवत आहेत. तर अपक्ष राहुल कलाटे निवडणूक लढवत आहेत. 


Aaditya Thackeray : कसब्यातील पोटनिवडणुकीसाठी आदित्य ठाकरे पहिल्यांदाच प्रचाराला येणार


कसबा पोटनिवडणुकीतील महाविकासआघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या रोड शो आणि सभेला उद्या (23 फेब्रुवारी) आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत. कसब्यातील पोटनिवडणुकीत ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे हे पहिल्यांदाच प्रचाराला उतरणार आहेत. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी काल (22 फेब्रुवारी) पिंपरी चिंचवड येथे महाविकास आघाडीचे उमेदवार उमेदवार नाना काटे यांच्या रोड शोमध्ये सहभागी झाले होते. याआधी काटे यांच्या प्रचार सभेला देखील आदित्य ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती. पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीत ठाकरे गटाचे राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवत आहेत. 


प्रचाराचा शेवटचा आठवडा


पुण्यातील कसबा आणि चिंचवड मतदार  संघाच्या पोटनिवडणुकीसाठीचा प्रचाराचा शेवटचा आठवडा आहे. त्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजपकडून प्रचासासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. कसब्यातील भाजप उमेदवार हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे कॉंंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्यासाठी कसब्यात  दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून प्रचार यात्रा सुरू आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Pune Bypoll election : चिंचवड-कसब्याच्या प्रचारादरम्यान आज होणार 'काटे की टक्कर'; भाजप आणि मविआचे 'हे' तडफदार नेते मैदानात