Puja Khedkar: राज्यासह देशभरात चर्चेत आलेल्या खेडकर कुटुंबाच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. पूजा खेडकरचे (Puja Khedkar) वडील दिलीप खेडकर (Dilip Khedkar) यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामकाजात अडथळा आणल्याच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात दिलीप खेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप खेडकर यांच्याविरुध्द सरकारी कामकाजात अडथळा आणल्याची तक्रार बुधवारी पोलिसांकडे देण्यात आली होती.
पूजा खेडकर (Puja Khedkar) पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी म्हणून कार्यरत असताना दिलीप खेडकर (Dlilip Khedkar) यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पूजाला (Puja Khedkar) स्वतंत्र केबिन द्यावे, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांवर दबाव आणला होता. त्याबाबतची तक्रार देण्यात आली होती त्यानंतर आता जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या जबाबानंतर दिलीप खेडकर (Dlilip Khedkar) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
पूजा खेडकरला (Pooja Khedkar) जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र दालन मिळावं, कार्यालयातील कामकाजात शिपाई उपलब्ध करून देण्यासाठी दिलीप खेडकरांनी (Dlilip Khedkar) कर्मचाऱ्यांवर दबाव टाकला होता. याप्रकरणी तहसीलदार दीपक आकडे यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. त्यांनी दिलेल्या दोन पानी तक्रार अर्जाची चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. दीपक आकडे यांना जबाब नोंदविण्यासाठी आज (बुधवारी) बंडगार्डन पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. मात्र ते काल जाऊ शकले नाहीत.
प्रशिक्षण काळात पूजा खेडकरने (Pooja Khedkar) स्वतंत्र दालनाची मागणी केली होती. तसेच कारला अंबर दिवा आणि महाराष्ट्र शासन अशी पाटी लावली. पूजा खेडकरच्या (Puja Khedkar) मागण्यांविरोधात तक्रार जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याकडे करण्यात आली. त्यानंतर दिवसे यांनी याबाबतचा अहवाल राज्य शासनाकडे पाठवला. त्यानंतर पूजा खेडकर आणि कुटुंबाचे एक-एक कारनामे समोर येऊ लागले आहेत.
पूजा खेडकरचं आयएएस पद रद्द
मात्र पूजा खेडकरने (Puja Khedkar) ट्रेनी असताना स्वतंत्र दालन, शिपाई किंवा इतर गोष्टींसाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.आपल्या मुलीला हवं ते मिळावं म्हणून वडिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर दबाव टाकला होता. यामुळे पूजा खेडकर चर्चेत आली. त्यात आता तिचे आयएएस पद देखील रद्द करण्यात आले आहे.
दरम्यान, आता दबाव टाकल्याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार यांनी कामात अडथळा आणला याबाबत तक्रार अर्ज बंडगार्डन पोलिसांकडे दिला होता.त्यानंतर आता दिलीप खेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.