पुणे : शहरातील गुन्हेगारी सध्या चांगलीच चर्चेत असून गेल्या काही दिवसांपासून कोथरुड (Pune) येथील गुंड निलेश घायवळ प्रकरणामुळे पोलिसांनी गुंडगिरीला आळा बसवण्याचं काम हाती घेतल्याचं दिसून येत आहे. मात्र, या ना त्या घटनांमुळे पुणे नेहमीच चर्चेत असतं. काही दिवसांपूर्वी एका स्कूल बस चालकाने व्यक्तीस मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर, आता आणखी एक व्हिडिओ (Viral video) व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, किरकोळ वादातून एका व्यक्तीला पीएमपी बस चालकाने शिवागाळ करत मारहाण केली. यावेळी, संबंधित व्यक्तीच्या कानशिलात देखील लगावली होती. 

Continues below advertisement


पुण्यात किरकोळ वादातून पी.एम.पी बस चालकाने एका व्यक्तीला शिवीगाळ करत मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे भेकराई नगर ते भोसरी या बस चालकाकडून एका व्यक्तीला शिवीगाळ करण्यात आली. यावेळी दोघांमध्ये वाद झाले आणि त्यानंतर बस चालकाने थेट बसमधून उतरत या व्यक्तीला कानशिलात लावली, ज्यामुळे या व्यक्तीचा चष्मा तुटला. त्यानंतर सुद्धा पी एम पी बस चालकाने या व्यक्तीला मारहाण करणे थांबवले नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे पी एम पी बस चालकाच्या विरोधात जोरदार टीका होत आहे. या घटनेसंदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची अद्याप माहिती नाही. मात्र, दोघांमधील संवादावरुन पोलिसांना बोलविण्याचं संबंधित व्यक्ती म्हणत होता. 


काही दिवसांपूर्वी भंडाऱ्यातील व्हिडिओही झाला व्हायरल


शालेय विद्यार्थिनींना एसटी महामंडळाच्या बसनं प्रवास करण्याकरिता मोफत पास दिला जातो. मात्र, याची मुदत संपल्यानंतर प्रवास करणाऱ्या एका विद्यार्थिनीला महिला बस वाहकानं पासबाबत विचारल्यानंतर धावत्या बसमध्येचं वाहक आणि विद्यार्थिनींमध्ये वाद निर्माण झाला होता. दरम्यानहा वाद विकोपाला गेल्यानं विद्यार्थिनींनं वाहकाच्या हातातील तिकीट कापण्याची मशीन पळविण्याचा प्रयत्न केला. तर, तिला पकडण्यासाठी महिला वाहकानं विद्यार्थिनीच्या डोक्याचे केस पकडून तिला पकडून ठेवलं. या वादात विद्यार्थिनीच्या डोक्याची प्रचंड वेदना झाल्यानं ती मोठमोठ्याने रडायला लागली होती. हा संपूर्ण प्रकार भंडारा शहरातील सूरेवाडा बस स्थानकावर दोन दिवसांपूर्वी घडला. यात ग्रामस्थांनी त्यांच्या मोबाईलमध्ये चित्रीत केलेला व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल झाला होता.


हेही वाचा


काँग्रेस प्रदेध्याक्षांचे 26 वर्षांपासूनचे व्रत, आदिवासींसोबत दिवाळी, जेवण बनवलं, चिमकुल्यांना वाढूही घातलं