Pune : पुण्यात शनिवार वाड्याच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून पुण्यातील नाना पेशव्यांची समाधीची साफ सफाई करण्यात आली. नानासाहेब पेशवे यांनी शनिवार वाड्याचे बांधकाम केले होते. नदी पात्राजवळ असणाऱ्या नाना पेशव्यांची समाधीची शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं साफ सफाई करण्यात आली. नानासाहेब पेशवे यांच्या समाधीकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप ठाकरे गटानं केला आहे. तसेच भाजपच्या लोकांचा फक्त प्रॉपर्टीवर डोळा असल्याचे ठाकरे गटानं म्हटलं आहे. 

Continues below advertisement

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून नानासाहेब पेशवे यांच्या समाधीची स्वच्छता केली जात आहे. दुधाने अभिषेक देखील घालण्यात येणार आहे. यावेली ठाकरे गटाकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात येत आहे. 

भाजपच्या लोकांचा फक्त प्रॉपर्टीवर डोळा 

शनिवार वाड्यात काय होत आहे ? याकडे लक्ष आहे. परंतू शनवार वाड्याच्या मालकाच्या समाधीची (म्हणजे नाना पेशवे यांच्या समाधीची) हालत काय आहे ? याकडे अनेक वर्ष पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. भाजपच्या लोकांचा फक्त प्रॉपर्टीवर डोळा आहे. जसे जैन हॉस्टेल आता शनवार वाडा. आणि ज्यांनी शनवार वाडा बांधला त्यांची अवहेलना यांना सहन होते, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटानं भाजपवर टीका केलीय. 

Continues below advertisement

शनिवारवाड्यातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रविवारी भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी प्रचंड आक्रमक झाल्या होत्या. पतीत पावन संघटना व मेधा कुलकर्णी यांनी शनिवारवाड्याच्या परिसरात शिववंदना करण्याचा प्रयत्न केला. तसेच या परिसरात गोमुत्रही शिंपडण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी या सगळ्याला मज्जाव केल्याने पोलीस आणि मेधा कुलकर्णी यांच्यात बाचाबाचीही झाली होती. ज्या ठिकाणी नमाज पडला गेला त्या ठिकाणी जाऊन आम्हाला शुद्धीकरण करायचे आहे, असा पवित्रा मेधा कुलकर्णी यांनी घेतला होता. मात्र, पोलिसांकडून त्यांना शनिवारवाड्यात जाण्यास मनाई करण्यात आली. शनिवारवाडा ही वास्तू कोणाच्या बापाचा नाही. शनिवारवाडा मराठा साम्राज्य, पेशव्यांचा आहे. पुणेकर सर्व जाती धर्मांचे आहेत. मेधा कुलकर्णी पुण्यातील हिंदू-मुस्लिम बांधवांचं वातावरण खराब करत आहेत. जाणीवपूर्वक तेढ निर्माण करत आहे.त्या विसरल्या आहेत की त्या खासदार आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली होती. कोथरुडमध्ये नाटकं झाली, आता कसब्यातून येऊन जाणीवपूर्वक हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करत आहेत. त्यांच्यावरच तातडीने गुन्हा दाखल करा. खासदार ताईला प्रार्थना असो की दुवा करणे असो एकच आहे हे समजत नाही किंवा त्या जाणीवपूर्वक करत आहे. मेधा कुलकर्णी यांनी शनिवारवाड्यामध्ये येऊन जी नाटकं केली त्यासाठी त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे, असे रुपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटले.

महत्वाच्या बातम्या:

Pune Shaniwar wada: शनिवारवाड्यात सामूहिक नमाज पठण, पोलिसांकडून गुन्हा दाखल; मेधा कुलकर्णी- रुपाली ठोंबरेंमध्ये जुंपली