पुणे : पुण्यातील केशवनगर परिसरात एक जुनं घर कोसळ आहे. या दुर्घटनेत पाच जण जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आहे.
या घराच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या अनेकांना वाचवण्यात यश आले आहे. तर ढिगाऱ्यात जनावरेसद्धा अडकली असून त्यांना बाहेर काढण्याचे काम चालू आहे.
सदर दुमजली घर सुभाष भांडवलकर या व्यक्तीचे आहे. भांडवलकर यांचा दुधाचा व्यवसाय असुन खाली गोठा आहे. तर वरती ते आपल्या कुटुंबासह राहत होते. भांडवलकरांच हे जुनं घर ओढ्याच्या काठाला आहे.
घराचं बांधकाम अधिकृत आहे का याचीही माहिती प्रशासनाकडून घेण्यात येतं आहे. या घराला महानगरपालिकेने घर खाली करण्याची नोटीस देखील दिली होती.