पुणे : राज्यातील लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या घटनांनंतर पुण्यातील (Pune) बोपदेव घाट सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणी राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त झाला. तसेच, पोलिसांनीही गंभीरतेने दखल घेत येथील प्रकरणात कारवाई केली आहे. त्यामुळे, नवनवीय तंत्रज्ञानाचा वापर करुन अखेर आरोपींच्या मुसक्या आवळ्यात आल्या आहते. आता, बोपदेव प्रकरणी आणखी अपडेट माहिती समोर आली असून बोपदेव घाटात ही घटना घडली ते ठिकाण आरोपीने पोलिसांना दाखवले. तसेच तरूणीवर अत्याचार केलेले घटनास्थळ देखील आरोपीने दाखवले आहे. या प्रकरणी धाक दाखवण्यासाठी आरोपीकडून वापरले गेलेले दांडके आणि कपडे पोलिसांनी (police) जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींकूडन पोलिसांची कसून चौकशी करण्यात येत असून आरोपी अख्तर शेखने 3 महिलांशी लग्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 


पुण्यातील बोपदेव घाट सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणी अपडेट माहिती समोर आली असून आरोपी अख्तर शेख याने आत्तापर्यंत 3 महिलांशी लग्न केले आहेत. बोपदेव घाटातील सामूहिक लैंगिक अत्याचाराचा मुख्य सूत्रधार आरोपी अख्तर शेख हाच आहे. शेख याने 3 महिलांशी लग्न केले असून आणखी एका मुलीशी त्याचे संबंध होते. नागपूरमधील 2 तर उत्तर प्रदेशमधील एका तरुणीशी त्याने लग्न केल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. बोपदेव घाट येथील अत्याचार करण्यापूर्वी आरोपीने गांजाचे सेवन केले असल्याची प्राथमिक माहिती आहे. या आरोपीवर याआधी देखील अशा प्रकारचे अनेक गुन्हे दाखल असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. दरम्यान, अख्तर शेख याला 22 ऑक्टोबर पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. 


या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार अख्तर शेख याला उत्तर प्रदेशमधून ताब्यात घेतले आहे. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. पुणे पोलिसांकडून आणखी एका आरोपीचा शोध अद्यापही सुरूच आहे. 3 ऑक्टोबर रोजी बोपदेव घाटातील टेबल पॉइंट परिसरात ही घटना घडली होती. या प्रकरणी अनेक खुलासे समोर येत आहेत, तर हा गुन्हा करण्यापुर्वी आरोपींना दारू प्यायली होती. गांजाचे सेवन केले होते, अशी माहिती समोर आली आहे. 


मोबाईल फ्लाईट मोडवर टाकला अन्...


बोपदेव घाटात गुन्हा करण्यापुर्वी आरोपींनी दारू आणि गांजाचे सेवन केल्याची माहिती आहे. तर त्यांनी या गुन्ह्या केल्यानंतरही आपले मोबाईल फोन देखील बंद करून ठेवले होते. आरोपींनी त्यांचे मोबाईलफोन फ्लाईट मोडवर ठेवल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. सामूहिक अत्याचार प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, पसार झालेल्या तिसऱ्या आरोपीचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. (Bopdev Ghat Incident)


गुन्हा केल्यानंतर पुन्हा तीन दिवस पुण्यात वास्तव्य


सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींचा पोलीस सर्वत्र तपास करत होते. तर हा गुन्हा केल्यानंतर आरोपी तीन दिवस पुण्यात फिरत असल्याची माहिती समोर आली आहे. 7 ऑक्टोबर ते तिघेजण भेटल्याचे आरोपीने चौकशीदरम्यान सांगितलं आहे. त्यानंतर शेख नागपूरला गेला. तर त्याचा दुसरा साथीदार चंद्रकुमार कनोजियाला 11 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली. याप्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी कनोजिया याला चौदा दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.