दौंड: पुणे सोलापूर (Pune- Solapur Road) राष्ट्रीय महामार्गावर यवत पोलिस स्टेशनच्या हद्दीत दोन कारची भीषण धडक (Accident) झाली. काल (बुधवारी, ता 20) रात्री झालेल्या या भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. तर 5 जण जखमी झाले आहेत. या अपघाताबाबत पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, राकेश भोसले हा आपल्या लाल रंगाच्या स्विफ्ट कारने पुणे-सोलापूर महामार्गावरून निष्काळजीपणे व नियमांचे उल्लंघन करून वेगाने जात होता, यावेळी त्याने उरुळीकडे जात असणाऱ्या स्विफ्ट डिझायर या गाडीला समोरासमोर धडक दिली. या धडकेत ज्ञानेश्वर थोरबोले (वय 50, रा. उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे) व गणेश दोरगे (वय 28, रा. यवत, ता. दौंड, जि. पुणे) यांचा जागीच मृत्यू झाला. (Pune Accident News)

तर या भीषण अपघातात पाच व्यक्ती जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले व जखमींना मदतकार्य सुरू केले. लाल रंगाच्या स्विफ्टचा कारचालक पुणे-सोलापूर महामार्गावरून निष्काळजीपणे व नियमांचे उल्लंघन करून वेगाने जात होता, यावेळी त्याने उरुळीकडे जात असणाऱ्या स्विफ्ट डिझायर या गाडीला समोरासमोर धडक दिली. या अपघातातील आरोपीवर कलमांतर्गत BNS ९०६(९). २८१. ९२५(अ). ९२७ (ब). ३२४ (४) (७) मो.वा. कायदा कलम १८४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुभाजक तोडून समोरून येणाऱ्या स्विफ्ट डिझायर गाडीला धडकला

मिळालेल्या माहितीनुसार राकेश भोसले हा आपल्या स्विफ्ट गाडीने निष्काळजीपणे वेगात जात दुभाजक तोडून समोरून येणाऱ्या स्विफ्ट डिझायर गाडीला धडकला. या धडकेत स्विफ्ट डिझायर गाडीतील अशोक थोरबोले व स्विफ्ट गाडीतील गणेश दोरगे यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात एकूण पाच जण जखमी झाले आहेत.जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात हुंडाई आय-२० गाडीचेही नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व मदतकार्य केले. या प्रकरणी यवत पोलिसांनी ज्ञानेश्वर विश्वनाथ थोरबोले यांच्या फिर्यादीवरून आरोपी राकेश मारुती भोसले यांचेवर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. वेगमर्यादा तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिला.