Devendra Fadnavis :  राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे दोन्ही बंधू एकत्र आल्यामुळे प्रतिष्ठेच्या झालेल्या दी बेस्ट एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीचा (BEST Election 2025) बहुप्रतिक्षित निकाल अखेर जाहीर झाला आहे. यामध्ये ठाकरे बंधूंना मोठा झटका बसला आहे. या निवडणुकीत प्रचंड चर्चा असलेल्या ठाकरे बंधूंच्या (Thackeray Brothers) उत्कर्ष पॅनेलला एकही जागा मिळालेली नाही. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशा प्रकारच्या निवडणुकीचे राजकारण करु नये असे आमचे मत होते. पण त्यांनी राजकारण केले ते लोकांना आवडले नाही. या निवडणुकीत राजकारण करायचे नसते असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाकरे बंधूंना टोला लगावला.  . 

90 च्या दशकात इंटरनेट, संगणकीकरण झाले, बदल झाले. मानव संसाधन तयार करु शकू का? असे प्रश्न विचारणारे खूप असतात. उत्तर देणारे कमी असतात असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यावेळी एमकेसीएल सुरु झाले. त्यावेळी देशातील मोठे नेतेही डिजिटल बाबत विचारत होते. डिजिटल डिव्हाइड दूर करण्याचे काम एमकेसीएलने केल्याच मुख्यमंत्री म्हणाले. यात वळसे पाटील यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यांना भाटकर सरांमुळे व्हिजन लाभल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. चांगले व्हिजन झाल्याने आता संस्था एवढी मोठी झाली आहे. त्यामुळे सरकारी संस्था झाली नाही खसजगी संस्था झाली नाही, पण बरे झाले सरकारी झाली नाही, काही जिल्ह्यात पण गेले नसते आणि मुंबईत हेलपाटे मारावे लागले असते प्रॉफिट वाली संस्थाही झाली नाही असे मुख्यमंत्री म्हणाले. 

जग वेगाने बदलत आहे

आज राज्यात साडेसहा हजार लोकांचे जाळे तयार झाले आहे. एमएससीआयटी मुळे डिजिटल डिव्हाइड भरुन काढू शकलो. आज जग वेगाने बदलत आहे. इंटरनेट आहे तर दुसरीकडे आज एआय सुनामी समोर आहे. एआय चे काम करणे आता महत्वाचे आहे. शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवावं लागेल असे मुख्यमंत्री म्हणाले. ऑइलपेक्षा डेटाची किंमत जास्त झाली आहे. डेटा जगाच्या संस्कृतीचा भाग झाला आहे. जग आता बदलत आहे. आरटीपीसीएल कॉम्प्युटर आणि एआयसाठी आपण आत ह्यूमन रिसोर्स तयार करु शकू असे मुख्यमंत्री म्हणाले. आज आयटी आली तेव्हा एक पाऊल पुढे होतो, आताही आपण एक पाऊल पुढे जाऊ असे मुख्यमंत्री म्हणाले. आज सगळ्यांना स्मार्ट फोन वापरणे जमत आहे. कंटेंट जास्त तयार होतो आपल्याकडे. जॉबचे नेचर बदलणार आहे, ज्यांना बदलायचं नाही त्यांच्यापुढे आव्हान आहे.  राज्य सरकार म्हणून आम्ही एमकेसीएलसोबत असू असे मुख्यमंत्री म्हणाले. आपल्याकडे भाषेचे वाद असतात, भाषणे अँप तयार झाली आहेत. मी मराठीत बोललो तर इतर भाषांमध्ये पण भाषण ऐकू शकतो, बदल होत आहेत असेही ते म्हणाले. 

 एमकेसीएलमुळं आम्ही चांगले काम प्रकल्प राबवू शकलो

बदलत्या मूल्यांकनात आपल्याकडून कार्य चांगलं चाललं आहे. एमकेसीएलमुळं आम्ही चांगले काम प्रकल्प राबवू शकलो. एमकेसीएल सोबत काम करुन शेवटच्या माणसापर्यंत जाऊ. आज अनेक आमच्या महिला ड्रोण चालायला शिकल्या आहेत. आज शेतात त्याचा वापर केला जातो. पुढची 25 वर्ष अजून चांगली घालवावी, गेले 25 वर्ष उत्तम बदल केले. आम्ही ही आपल्या कार्यपद्धतीत वाटा देऊ असे मुख्यमंत्री म्हणाले. 

काही भागात अजून पाऊस सुरु, आपत्ती व्यस्थापनाबाबत काम सुरु

काही भागात अजून पाऊस सुरू आहे. आपत्ती व्यस्थापनाबाबत काम सुरु आहे. वेगवेगळ्या राज्याशी आपण बोलत आहोत. हळूहळू विसर्ग वाढवला जात आहे. मला पुण्यातील टीडीआर विषयी अजूनही माहिती नाही यात काही बेकायदेशीर असेल तर मी थांबवेल असे मुख्यमंत्री म्हणाले. 14 लाख एकर जमीनवरील पिके पावसामुळं नष्ट झाली आहेत. चार दिवसात मदत दिली जात नाही. मदत सगळ्यांना दिले जाईल, पंचनामे करुन त्यांना मदत केली जाईल असे मुख्यमंत्री म्हणाले. मंत्री संजय शिरसाठ यांच्यावर रोहित पवारांनी केलेल्या आरोपावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, अशी मंडळी रोज बोलत आहेत, पुरावे दिले पाहिजेत. विनापुरावे आरोप करणे योग्य नाही, पुराव्याने आरोप केले की त्याचे उत्तर मिळते असे मुख्यमंत्री म्हणाले.  पुण्यात दरवर्षी गणपती मंडळाचे प्रश्न निर्माण होतात, यावेळेस पुणे पोलिस आणि  गणपती उत्सव मंडळ हे प्रश्न सोडवतात त्यात मुख्यमंत्र्यांना यायची गरज भासत नाही असेही ते म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

Mumbai BEST Election Results: बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनेलचा मोठा पराभव, एकही जागा मिळाली नाही, महायुतीला 7 जागा, शशांक राव पॅनलने मैदान मारलं