Pune Accident News: डोक्यावरुन गाडीचे चाक गेल्याने एका अज्ञात व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील वाघोली परिसरातील बाजारतळ येथे घटना घडली आहे. मात्र मृ्त्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटली नाही आहे. या प्रकरणी मोटार वाहन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणीकंद पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


वाघोली भाजी मंडई जवळच्या परिसरातील मैदानात हे व्यक्ती झोपली होती. पहाटे या परिसरात भाजीच्या गाड्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. या सगळ्या दरम्यान एका कारचे चाक या व्यक्तीच्या डोक्यावरुन गेलं त्यातच त्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत्यू झाल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी ही घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पुण्यात एका अपघातात चिमुकलीला चिरडले
चार दिवसांपुर्वी पुण्यातील सातववाडीमध्ये चिमुकलीला कंटेनरने चिरडल्याची धक्कादायक घटना घडली होती. वडिलांसोबत शाळेत जात असताना हा अपघात घडला होता. हडपसर पोलीस ठाण्यात या प्रकारणावाबत नोंद करण्यात आली होती. यात वडिल आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला होता. त्यामुळे सातववाडी परिसरात हळहळ व्यक्त केली गेली. कंन्टेनर भरधाव वेगात होता. त्यामुळे ही घटना घडल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे होते. नीलेश साळुंखे आणि मीनाक्षी साळुंखे अशी मृतांची नावे होती.


वडील रोजप्रमाणे  शाळेत सोडायला निघाले होते त्यावेळी अचानक एका कंटेनरने मागून सात वर्षीय मुलीला धडक देत चिरडले. मीनाक्षी साधना विद्यालयात पाचवीत शिकत होती. निलेश हे फुरसुंगीहून हडपसरकडे आपल्या मुलीच्या शाळेच्या दिशेने जात होते. सातववाडी येथे मागून भरधाव येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये नीलेश हे ट्रकच्या चाकाखाली आल्याने गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला होता. सध्या अपघाताचं प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे. अनेक तरुण गाड्या भरवेगाने पळवतात. त्यामुळे रस्त्यावरील अपघाताचं प्रमाण वाढल्याचं अनेकदा सांगण्यात येतं.