पुणे: पुणे शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातात (Pune Accident) मोठी वाढ झाली आहे. निकृष्ठ दर्जाच्या रस्त्यावर खड्डे पडतात पावसामुळे ते दिसत नाहीत, त्यामुळे अनेकदा अपघात होऊन अनेक नागरिकांना दुखापत झाल्याच्या घटना समोर येतात, अशातच पुण्यातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्याने एका ज्येष्ठ नागरिकाचा बळी गेल्याचा दुर्दैवी प्रकार समोर आला आहे. खड्ड्यात अडकून दुचाकी पडल्यानंतर वृद्धाला मागून येणाऱ्या कारने चिरडल्याची (Pune Accident) दुर्घटना घडली. जगन्नाथ काशिनाथ काळे असं 61 वर्षीय मयत ज्येष्ठ नागरिकाचं नाव आहे. पुण्यातील औंध भागातील गजबजलेल्या राहुल हॉटेलसमोर ही दुर्दैवी घटना घडली. अपघाताचा प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. (Pune Accident CCTV Video)

जगन्नाथ काळे (61 वर्ष) हे नाबार्डमध्ये काम करायचे. सध्या रिटायर्ड झाले होते. पुण्यातील औंध परिसरातील राहुल हॉटेल समोर 30 जुलैला ही घटना घडली. ते रस्त्यावरुन जाताना रस्त्यावरील खड्ड्यामुळे गाडी घसरली आणि मागून आलेल्या कारखाली ते चिरडले गेले. या संपूर्ण अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. ते औंध परिसरातील राहुल हॉटेलसमोरुन गाडी चालवत असताना रस्ता आणि पेविंग ब्लॉकच्यामध्ये खड्डा निर्माण झाल्यामुळे या खड्ड्यातून त्यांची गाडी घसरली. यामुळे ज्येष्ठ नागरिकाचा तोल गेला. मात्र तेवढ्यात ज्येष्ठ नागरिक मागून आलेल्या कारच्या खाली चिरडले गेले. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, पुण्यातील जगन्नाथ काळे यांच्या मृत्यूला महापालिका जबाबदार आहे, त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी आता स्थानिक नागरिकांनी केली आहे. याच रस्त्यावर पेव्हिंग ब्लॉक आणि रस्त्याच्या मध्ये जो खड्डा निर्माण होतोय त्यामुळे आतापर्यंत 7 ते 8 अपघात झाल्याचं स्थानिकांनी सांगितलं आहे. घरातल्या ज्येष्ठांना बाहेर पाठवण्यासाठी धाकधूक वाटते, अशाही प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या आहेत. त्याचबरोबर या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत देखील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. (Pune Accident)

नेमकं काय घडलं?

औंध परिसरातील राहुल हॉटेल समोरुन ते दुचाकीवरती जात असताना रस्ता आणि पेविंग ब्लॉकच्यामध्ये खड्डा निर्माण झाल्यामुळे या खड्ड्यातून गाडी घसरली. यामुळे ज्येष्ठ नागरिकाचा तोल गेला. मात्र तेवढ्यात ज्येष्ठ नागरिक मागून आलेल्या कारच्या खाली चिरडले गेले. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे, या दुर्दैवी घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. (Pune Accident)