Continues below advertisement

पुणे : शरद पवार हे आमचे नेते असून महापालिका निवडणुकीसाठी कुणासोबत युती करायची याचा निर्णय तेच घेतील, आमच्या वाट्याला ज्या जागा येतील त्या तुतारी या चिन्हावरच लढवल्या जातील असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी सांगितलं. पुण्यात आम्ही चांगली मोर्चेबांधणी केली आहे, लोकांना वेगळा पर्याय हवा आहे असंही ते म्हणाले.

राज्याचे लक्ष लागलेल्या पुणे महापालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत पक्षाच्या तयारीची माहिती प्रशांत जगताप यांनी दिली. तसेच पुण्यात अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यावरही प्रशांत जगताप यांनी प्रतिक्रिया दिली.

Continues below advertisement

माझे नेते हे पवार साहेब आणि सुप्रिया सुळे आहेत. मी साहेबांवर विश्वास ठेऊन आलोय, मला त्यांच्याबाबत खात्री आहे. मी जाहीरनामा दिला आहे. पक्षाने कुणासोबत युती करावी हा पवारसाहेबांचा निर्णय आहे असं प्रशांत जगताप म्हणाले.

Prashant Jagtap News : लढून जिंकू शकतात त्यांना एकत्र आणणार

प्रशांत जगताप म्हणाले की, "आमच्या वाट्याला ज्या जागा येतील त्या तुतारी या चिन्हावरच लढू. त्यासाठी आम्ही महाविकास आघाडीतील राज्य स्तरावरील नेत्यांशी चर्चा केली आहे. राज्यातील काँग्रेसची ताकद दुर्लक्षित करून चालणार नाही. कोणतीही सत्ता नसताना, कोणताही स्त्रोत नसताना त्यांनी अजित पवारांच्या पक्षापेक्षाही जास्त जागा निवडून आणल्या. त्यामुळे पुण्यामध्ये जे लढून जिंकू शकतात ते सगळे महाविकास आघाडी म्हणून कसे एकत्र येऊ शकतात यावर विचार सुरू आहे."

Pune Election : पवारसाहेबांचा आदेश महत्त्वाचा

प्रशांत जगताप म्हणाले की, "काल रात्रीपर्यंत आमच्या महाविकास आघाडी म्हणूनच बैठका झाल्या आहेत. महायुतीमध्ये कुणाला घ्यायचं, कुणासोबत आघाडी करायची याबाबतचा निर्णय शरद पवार घेतली. अजितदादा काय निर्णय घेतील ते माहिती नाही, पण आमच्यासाठी शरद पवार काय आदेश देतात ते महत्त्वाचं."

Pune NCP Alliance : 25 तारखेपर्यंत जागावाटप

पुण्यातील जागावाटपाची चर्चा झाली आहे. महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांनी त्यावर चर्चा केली आहे. त्यामुळे येत्या 25 तारखेपर्यंत जागावाटपावर अंतिम निर्णय जाहीर केला जाईल अशी माहिती प्रशांत जगताप यांनी दिली.

ही बातमी वाचा: