पुणे: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. मंगळवारी 22 एप्रिल रोजी झालेल्या या हल्ल्यात 26 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. पुलवामा हल्ल्यानंतर काश्मीरमधील हा सर्वात मोठा हल्ला होता. यानंतर, भारत सरकारने कारवाई करत सिंधू पाणी करार रद्द केला आणि पाकिस्तानी नागरिकांना दिलेले व्हिसा देखील रद्द केले, इतकेच नाही तर त्यांनी पाकिस्तानसाठी अटारी बॉर्डरचे दरवाजे देखील बंद केले आहे. पाकच्या नागरिकांना देखील त्यांच्या देशात परत जाण्यासाठी सांगण्यात आलं आहे. या सर्व घडामोडी सुरू असतानाच आता वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं, सरकारने तेथील पर्यटकांना बाहेर काढलं. ही चूक केली. खरं तर त्यांना सपोर्ट द्यायला हवा होता, पर्यटकांच्या मनात भीती नव्हती. त्यांना सुरक्षा मिळणार की नाही हा प्रश्न होता. पाहिजे तर सरकारने पर्यटकांचा खर्च करायला हवा होता. हल्ला होवूनही पर्यटक आहेत आणि स्थानिक मदत करत आहेत. तर पर्यटकांना बाहेर काढलं नसतं त्यांना सुरक्षा दिली असती तर कळलं असतं परिस्थिती कळाली असती की, परिस्थिती पूर्वपदावर येत आहे, असं म्हटलं आहे. 

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, झेलम , चिनाब पाणी करार स्थगित करण्याचा पाणी सांगितला जात आहे. नद्याचं पाणी भारतीय सरकार वापरणार कसं याचा खुलासा केला नाही. त्याची खोली वाढवणार आहोत किंवा पाणी कसे अडवणार हे सांगितलं नाही. वर्ड बँकेची गॅरंटी आहे, त्याचं परिणाम काय होणार आहे, हे केंद्र सरकारने सांगावं. सामान्य माणूस हे विचारात आहेत. इतकी हत्यार विकत घेतली आहेत, विमान घेतली त्याच उपयोग काय? केंद्र सरकारला तुम्ही ऍक्शन घेणार आहात का? कागदोपत्राई घोडे नाचवणं थांबवा. ठोस कारवाई तुम्ही करणार आहात का? आर्मी उत्तर द्यायला तयार आहे. ज्याची कमतरता आहे ती पॉलिटिकल विंगची आहे, राजकीय कमतरता आहे. निर्णय घ्यायला शासनाला लोकांचा पाठिंबा आहे. लोक शासनाच्या पाठीशी उभे राहतील असंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे. 

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले आम्ही 2 मे ला हुतात्मा स्मारकाला बसणार आहोत. यावेळी जे पाठिंबा देत आहेत त्यांनी तिथे कागदावर सही करावी. कारवाईला पाठिंबा असेल तर सही करावी ही मोहीम आम्ही घेणार आहोत. राजकीय पक्षांचे कार्यकते यायला हरकत नाही. सर्व पक्षांच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आलं तर चालेल. आम्ही पक्षाचा ध्वज वापरणार नाही आम्ही राष्ट्रध्वज घेऊन बसणार आहोत. इतर पक्षांनी सहभागी व्हावं, तो पुर्णपणे त्यांचा निर्णय असणार आहे. पण येताना त्यांनी पक्षांचा झेंडा आणू नये. 2 मे च्या आंदोलनात उपस्थित राहून पाठिंबा दर्शवावा. आम्ही नेत्यांना बोलणार नाहीत नेत्यांनी स्वतःहून निर्णय घ्यावा, असंही पुढे प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.  

पुढे प्रकाश आंबेडकर म्हणाले, दोन प्रिंसिपलवर निर्णय घेणं महत्वाचं आहे. तुमच विल आहे का आणि गरज या दोन गोष्टीचा संगम होणार असेल तर निर्णय घेतला पाहिजे. ट्रेनिंग सेंटर उध्वस्त करा. तुमच नाक कापल गेलेलं आहे तुमची इज्जत वाढते का? कुठले इनपुट नव्हते, सर्व इनपुट होते, निर्णय घेण्याची क्षमता राजकीय नेत्यांमध्ये नाही , त्यामुळे आम्ही हुतात्मा स्मारकासमोर बसणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.  

धर्म विचारून गोळी मारली यासंबंधिच्या प्रश्नावर उत्तर देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, धर्म विचारून गोळी मारली याला काहीजण होय म्हणतात. काही नाही म्हणतात. जे गेले आहेत ते सर्व भारतीय आहेत. त्यामध्ये ख्रिशन, मुस्लिम पण मारले गेलेत. मात्र इथे मध्यम आणि राजकीय नेते नरेटीव सेट करत आहेत. गेले ते भारतीय आहेत, सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान बसू शकत नाहीत म्हणजे ते किती सीरियस आहेत हे लक्षात येत. पंतप्रधानांनी ब्रिफिंग करणे गरजेचं होतं, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.