काल शुक्रवारी रात्री कोंढवा परिसरात एका पोलीस व्हॅनने सात ते आठ वाहनांना धडक दिली. या व्हॅनचा चालक मद्यधुंद अवस्थेत होता. चालक मद्यपान करुन व्हॅन चालवत असल्याने हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे. या व्हॅनमधून लग्नाचं वऱ्हाड नेलं जात होतं. ही गाडी पोलिसांच्या नातेवाईकांच्या लग्नासाठी वापरण्यात आल्याची शक्यता आहे.
सध्या या चालकासंदर्भात भारती विद्यापीठ पोलिसांकडे 2 ते 3 तक्रारी आल्या आहेत. मात्र पुरेशी माहिती उपलब्ध नसल्यानं गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही, असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. याबाबत पोलिसांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे.