पुणे पोलीस कर्मचाऱ्याकडून विवाहितेचा अश्लिल व्हिडीओ, आरोपी अटकेत
एबीपी माझा वेब टीम | 26 Sep 2017 10:00 PM (IST)
पुण्याच्या पोलीस दलातल्या एका कर्मचाऱ्याने एका विवाहितेचा अंघोळ करतानाचा व्हीडिओ तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पुणे : पोलिसांनाच सध्य़ा आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याची वेळ आली आहे. कारण, पुण्याच्या पोलीस दलातल्या एका कर्मचाऱ्याने एका विवाहितेचा अंघोळ करतानाचा व्हीडिओ तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडितेच्या पतीला दमदाटी करुन मारहाण करण्यात आली. समीर पटेल असं अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे.सोमवारी सकाळी 10 च्या सुमारास ही घटना घडली. चित्रिकरण करताना समजल्यानंतर महिलेने पोलिसांत ही माहिती दिली. या संदर्भात चतुशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी कर्माचाऱ्यांला अटक केली असून इतर 3 आरोपी फरार आहेत.