रांजणगाव एमआयडीसीतल्या टोबॅको कंपनीतून हा टेम्पो वेगवेगळ्या सिगरेटचे 865 कार्टन घेऊन अंबरनाथकडे निघाला होता. मात्र, मुंबई-पुणे महामार्गावर लोणावळ्याजवळ 8 ते 10 जणांनी हा टेम्पो अडवला आणि चालकाला मारहाण करुन टेम्पो पळवला. यानंतर चालकाच्या तक्रारीवरुन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

पेट्रोल पंपावरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात टेम्पो चोरणारी ही टोळी कैद झाली. यानंतर पोलिसांनी कारवाई करत 5 जणांना गजाआड केलं तर 3 आरोपी अजूनही फरार आहेत. या संपूर्ण सिगरेट पाकिटांची बाजारातली किंमत तब्बल 1 कोटी 87 लाख रुपये आहे. पोलिसांनी सगळा मुद्देमाल हस्तगत केला आहे.