PMPML Pune Recruitment 2022 : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) त्यांच्यातील कंडक्टरची कमतरता लक्षात घेऊन लवकरच 2000 बदली, हंगामी, दैनंदिन कंडक्टरची भरती करणार आहे. पीएमपीएमएलमध्ये कंडक्टरचा मोठा तुटवडा असल्याने चालकांना कंडक्टर बनवण्याशिवाय प्रशासनाकडे पर्याय नव्हता.


या पार्श्‍वभूमीवर पीएमपीएमएल येत्या काही वर्षांत दोन हजार चालक-वाहकांची भरती करणार आहे. त्यासाठी पीएमपीएमएल लवकरच निविदा प्रक्रिया राबवणार आहे. यामुळे शहरातील 2 हजार तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. आम्हाला कंडक्टरची मोठी कमतरता भासत आहे. म्हणून, आम्ही 600 चालकांना कंडक्टर म्हणून प्रशिक्षित केले आहे, तर भविष्यात 2000 कंडक्टरची भरती करण्याचा आमचा विचार आहे. या संदर्भात निविदा प्रक्रिया केली जाईल, असे पीएमपीएमएलचे परिवहन व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांनी सांगितले.


भरती प्रक्रियेबाबत पीएमपीएमएल लवकरच निविदा प्रक्रिया राबवणार असून, नागरिकांना याबाबत अधिकृत माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे नोकरभरतीसंदर्भात नागरिकांनी कोणत्याही एजंटला किंवा नोकरी देण्याचा दावा करणाऱ्या किंवा पैशांची देवाणघेवाण करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला भेटू नये, असे पीएमपीएमएल प्रशासनाने कळवले आहे.


भरती प्रक्रिया कशी असेल?
या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.


कोणताही एजंट नसेल


अनेकदा भरती प्रक्रियेत मोठे घोटाळे समोर आले, अशा प्रक्रियेत एजंटच्या माध्यमातून अनेकांची लुटमार केली जाते. काम करुन देतो. नोकरी देतो असं सांगण्याऱ्यापासून या उमेदवारांनीदूर रहावं, असं आवाहन विभागाकडून करण्यात आलं आहे. कोणत्याही भरती संदर्भातील कोणतीही माहिती हवी असल्यास महाभरती अॅप डाऊनलोड करा. त्यावर सगळी माहिती उपलब्ध असेल मात्र कोणत्याही एजंटच्या आमिषाला बळी पडू नका, असंही त्यांनी सांगितलं आहे.