Pashan lake Garden:  पुण्यातील (pune) पाषाण तलावालगत असलेल्या उद्यानात (Pashan lake Garden) प्रेमीयुगुलांना (Couples) नो एन्ट्री करण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे. महापालिकेकडून तसा बोर्ड उद्यानात लावण्यात आला आहे. या उद्यानातील पक्षांना आणि पक्षी निरीक्षकांना या कपल्सचा त्रास होतो असा महापालिकेच्या उद्यान विभागाच दावा आहे. मात्र यामुळे पुण्यासारख्या शहरात प्रेमी युगलांना उद्यानात बंदी घालणं कितपत योग्य आहे?, असा प्रश्न विचारला जात आहे.


पाषाण तलावालगत सुंदर उद्यान आहे. अनेक प्रेमीयुगुल किंवा तरुण-तरुणी संध्याकाळी टेहाळण्यासाठी या उद्यानात येत असतात. मात्र याच उद्यानात थेट प्रेमीयुगुलांना नो एन्ट्री असा बोर्ड लावल्याने अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. हिरवंगार, थोडं शहराबाहेर आणि शांत ठिकाणी असल्याने या उद्यानात अनेक जातींचे पक्षी आढळतात. पक्षी निरीक्षक या पक्षांचा अभ्यास करण्यासाठी येतात. त्यांना या प्रेमीयुगुलांचा त्रास होतो, असं पालिकेचं स्पष्ट म्हणणं आहे. या उद्यानाची जैवविविधता जपता यावी, यासाठी महापालिका,  स्थानिक नागरीक, पर्यावरण प्रेमी प्रयत्नात असतात. उद्यानाच्या संवर्धनासाठी देखील त्यांच्याकडून प्रयत्न केले जातात. 


प्रेमीयुगुलांना बंदीमुळे प्रश्न
पुणे शहरात शिक्षणासाठी आलेल्या तरुणांची संख्या प्रचंड प्रमाणात आहे. महाराष्ट्रातून नाही तर देशभरातून पुण्यात तरुण नव्या शिक्षण आणि नोकरीसाठी येतात. तरुणांची संख्या जास्त असल्याने प्रत्येक ठिकाणी तरुणांची गर्दी बघायला मिळते. त्याच बरोबर पुण्यातील उद्यानातदेखील अनेक तरुण तरुणी असतात. मात्र पुण्यासारख्या शहरात उद्यानात बंदी घालल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.  


दोन मृतदेह  आढळले
या तलावात आतपर्यंत दोन मृतदेह आढळले आहे. महापालिकेची या उद्यानात सुरक्षादेखील नाही. प्रेमीयुगुलांमुळे वाद होऊ शकतात. शिवाय अनेक पक्षी अभ्यासक या ठिकाणी अभ्यासाला येतात. त्यांना अडथळा निर्माण होतो. त्यामुळे ही बंदी घातली आहे. मात्र शहरातील बाकी उद्यानं प्रेमीयुगूलांसाठी खुली ठेवण्यात आली असल्याचं महापालिकेनं स्पष्ट केलं आहे.


पु.ल. देशपांडे उद्यानात बंदी नाही
पुण्याच्या सिंहगड रोड परिसरात असलेल्या पु. ल. देशपांडे उद्यानात प्रेमीयुगुलांना प्रवेश आहे. या उद्यानात देखील रोज गर्दी बघायला मिळते. अनेक अभ्यासक मात्र दिसत नाही. सुंदर पद्धतीने नियोजन केलेल्या या उद्यानात शनिवार रविवार गर्दी असते. मात्र या उद्यानाच्या सुरक्षेकडे पालिकेचं लक्ष असतं. शिवाय उद्यानात काही धोकाही नाही त्यामुळे पालिकेने पु.ल. देशपांडे उद्यानासह पुण्यातील इतर उद्यानं प्रेमीयुगुलांसाठी खुले ठेवले आहेत.