तुकाराम मुंढे यांची नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंढेंनी नाशिक पालिकेची साफसफाई हाती घेतली आहे. मात्र पीएमपीएमएलमध्ये पुन्हा पहिले पाढे पंचावन्न अशी स्थिती निर्माण झाली आहे. मुंढेंनी अध्यक्षपदी असताना घेतलेले निर्णय पीएपीएमएलच्या संचालक मंडळाने रद्द केले आहेत.
बडतर्फ आणि निलंबित करण्यात आलेल्या 158 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना पुन्हा कामावर घेता येणार आहे. त्याशिवाय ज्येष्ठ नागरिकांच्या पासमधे करण्यात आलेली वाढही मागे घेतली जाणार. मुंढेंच्या काळात मंजूर झालेला आस्थापना आराखडाही नामंजूर करण्यात येणार आहे.
पीएमपीएमएलच्या संचालक मंडळावर महापौर, सरंजामी समिती अध्यक्ष, उपमहापौर, नगरसेवक अशा राजकीय व्यक्ती आहेत. संचालक मंडळाने घेतलेले हे निर्णय तुकाराम मुंढेंच्या जागी आलेल्या नयना गुंठे मान्य करणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे.