पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मोठ्या घडामोडी घडल्या, अनेकांचं तिकीट कापलं, नव्या लोकांना संधी मिळाली, नाराजीनाट्या दिसून आलं, मात्र पुण्यात एबी फॉर्म चक्क गिळण्याचा प्रकार घडला आहे. एबी फॉर्म गिळणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार उद्धव कांबळे याच्यावर निवडणूक अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस त्याचा शोध घेताय आहेत.
PMC Election 2026: नेमकं काय घडलं?
पुण्यातील पद्मावती भागातील प्रभाग क्रमांक ३६ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ड गटातून मच्छिंद्र ढवळे यांना उमेदवारी देण्यात आली. ढवळे यांनी पक्षाच्या एबी फॉर्मसह मंगळवारी अर्ज दाखल केला. मात्र त्यानंतर पक्षाकडून त्याच जागी उद्धव कांबळे या उमेदवाराला देखील एबी फॉर्म देण्यात आला आणि त्याने देखील मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र मच्छिंद्र ढवळे यांचा फॉर्म आपल्या आधी भरला गेलाय आणि त्यामुळे तो वैध ठरु शकतो हे उद्धव कांबळेच्या लक्षात आलं. त्यामूळे बुधवारी उमेदवारी अर्जाची छाणणी होत असताना उद्धव कांबळे कात्रजच्या क्षेत्रिय कार्यालयात पोहोचला आणि त्याने त्याच्या प्रभागातील सर्व उमेदवारांचे अर्ज पाहण्यासाठी मागितले.
नियमानुसार तो त्याचा अधिकार असल्याने कर्मचाऱ्यांनी अर्जांचा गठ्ठा त्याला पाहण्यासाठी दिला. मात्र त्याने मच्छिंद्र कांबळेच्या निवडणूक अर्जासोबत जोडलेला पक्षाचा ए बी फॉर्म फाडला आणि तो बाथरुमच्या दिशेने पळाला. निवडणूक कर्मचारी त्याच्या मागे पळाले, मात्र उद्धव कांबळेने तो अर्ज पटकन स्वतःच्या तोंडांत कोंबला आणि गिळून टाकला. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून पोलीसांकडे या घटनेची तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी उद्धव कांबळेच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.
PMC Election 2026: फॉर्म पाहायला मागितला अन्...
पुण्यातील पद्मावती भागातील प्रभाग क्रमांक ३६ मध्ये शिंदे शिवसेनेकडून ड गटातून मच्छिंद्र ढवळे यांना उमेदवारी देण्यात आली. ढवळे यांनी पक्षाच्या एबी फॉर्मसह मंगळवारी अर्ज दाखल केला. मात्र त्यानंतर पक्षाकडून त्याच जागी उद्धव कांबळे या उमेदवाराला देखील एबी फॉर्म मिळाला आणि त्याने देखील मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र मच्छिंद्र ढवळे यांचा फॉर्म आपल्या आधी भरला गेलाय आणि त्यामुळे तो वैध ठरु शकतो हे उद्धव कांबळेच्या लक्षात आलं. त्यामूळे बुधवारी उमेदवारी अर्जाची छाणणी होत असताना उद्धव कांबळे कात्रजच्या क्षेत्रिय कार्यालयात पोहोचला आणि त्याने त्याच्या प्रभागातील सर्व उमेदवारांचे अर्ज पाहण्यासाठी मागितले. नियमानुसार तो त्याचा अधिकार असल्याने कर्मचाऱ्यांनी अर्जांचा गठ्ठा त्याला पाहण्यासाठी दिला. मात्र त्याने मच्छिंद्र कांबळेच्या निवडणूक अर्जासोबत जोडलेला पक्षाचा ए बी फॉर्म फाडला आणि तो बाथरुमच्या दिशेने पळाला. निवडणूक कर्मचारी त्याच्या मागे पळाले, मात्र उद्धव कांबळेने तो अर्ज पटकन स्वतःच्या तोंडांत कोंबला आणि गिळून टाकला. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून पोलीसांकडे या घटनेची तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी उद्धव कांबळेच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.
PMC Election 2026: फॉर्म गिळणाऱ्या कांबळे यांच्यावर गुन्हा
सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा वेल्हा येथील नायब तहसीलदार मनीषा भुतकर यांनी, सरकारी कामात हस्तक्षेप आणि सरकारी दस्तऐवज नष्ट केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करत कायदा व सुव्यवस्था भंग केल्याप्रकरणी उद्धव कांबळे यांना ताब्यात घेतले.