पुणे : राज्यात मुंबईनंतर सर्वांच लक्ष लागलेल्या पुणे (Pune) आणि पिंपरी चिंचवड (Pune, PCMC) महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणे निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील सत्ता समीकरणे लक्षात घेऊन दोन्ही गटांनी जागावाटपाचा प्राथमिक फॉर्म्युला निश्चित केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच जाहीर सभेतून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर, दोन्ही राष्ट्रवादीनी ठरवलेल्या फॉर्म्युल्यानुसार राष्ट्रवादी (NCP) शरद पवार 18 जागांवर उमेदवार उभे करणार असून उर्वरित 110 जागांवर राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्याकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये, केवळ 4 जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला देण्यात आल्याचं दिसून येत आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून 32 प्रभागातील 128 उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये, प्रभाग क्रमांक 26 मधील उमेदवारांच्या नावांपुढे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार असे लिहले आहे. इतर, उर्वरीत सर्व प्रभागातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे, शरद पवारांच्या राष्ट्रवादी म्हणजेच तुतारी चिन्हावर केवळ 4 उमेदवारच असल्याचे दिसून येते. तर, प्रभाग क्रमांक 13 मध्ये अजित पवारांचे तीनच उमेदवार दिसून येतात. त्यामुळे, अजित पवारांच्या घड्याळ चिन्हावर 123 उमेदवार असल्याचं स्पष्ट होत आहे.
प्रभाग क्रमांक 1 ते 32 (अ,ब,क,ड) सर्व उमेदवारांची नावे (प्रभाग 26 वगळून)
1.विकास नामदेव साने2.साधना नेताजी काशिद3.संगिता (नानी) प्रभाकर ताम्हाणे4.यश दत्तात्रय साने5.रुपाली परशुराम आल्हाट6.अश्विनी संतोष जाधव7.विशाल विलास आहेर8.वसंत प्रभाकर बोराटे9.अनुराधा दिपक साळुंके10.प्रकाश बबन आल्हाट11.पूनम अमित तापकीर12.लक्ष्मण सोपान सस्ते13.प्रतिभा अभिमन्यू दोरकर14.मंगेश शिवाजी असवले15.श्रध्दा योगेश आंकुलवार16.चंद्रकांत साहेबराव वाळके17.भिमाबाई पोपटराव फुगे18.अमर परशुराम फुगे19.प्रियांका प्रविण बारसे20.राहुल बाळासाहेब गवळी21.वर्षा गणेश बडे22.सुर्यवंशी निलेश रामू23.प्रियंका मयुर लांडे24.संतोष काळूराम लांडे25.विराज विश्वनाथ लांडे26.अनुराधा सुशिल लांडे27अश्विनी निलेश फुगे28.अमोल मधुकर डोळस29.सोमा रविंद्र सावळे30.राजश्री अरविंद गार्गे31.अश्विनी संजय वाबळे32.तुषार भिवाजी सहाणे33.सिध्दार्थ अण्णा बनसोडे34.वैशाली ज्ञानदेव घोडेकर लोंढे35.सारिका विशाल मासुळकर36.राहुल हनुमंतराव भोसले37.निलीमा रुपेश पवार38.वर्षा दत्तात्रय भालेराव39.संदीप श्रीरंग चव्हाण40.सतिश मधुकर क्षीरसागर41.मारुती गणपत जाधव42.मयुरी निलेश साने43.सत्यभामा संजय नेवाळे44.नारायण सदाशिव बहिरवाडे45.शरद वसंत भालेकर46.चारुलता रितेश सोनावणे47.सीमा धनंजय भालेकर48.पंकज दतात्रय भालेकर49.तानाजी विठ्ठल खाडे50.प्रिया प्रसाद कोलते51.संतोष शामराव कवडे52.विशाल बाळासाहेब काळभोर53.वैशाली जालिंदर काळभोर54.अरुणा गणेश लंगोटे55.प्रमोद प्रभाकर कुटे56.धनंजय विठ्ठल काळभोर57.प्रोतमराणी प्रकाश शिदे58.सरिता अरुण साने59.निलेश ज्ञानदेव शिंदे60.श्रेया अक्षय तरस61.जयश्री मोरेश्वर भोंडवे62.आशा तानाजी भोंडवे63.मोरेश्वर महादू भोंडवे64.मनिषा राजेश आरसुळ65.भाऊसाहेब सोपानराव भोईर66.शोभा तानाजी वाल्हेकर67.शेखर बबन चिंचवडे68.पूजा प्रशांत अगज्ञा69.ज्योती सचिन निंबाळकर70.अनंत सुभाष को-हाळे71.अश्विनी गजानन चिंचवडे72.रिना लहू तोरणे73.दिपक हिरालाल मेवाणी74.सविता धनराज आसवाणी75.काळूराम मारुती पवार76.जितेंद्र बाबासाहेब ननावरे77.मनीषा शाम लांडे78.वर्षा सर्जेराव जगताप79.योगेशकुमार मंगलसेन बहल80.निकिता अर्जुन कदम81.संदीप बाळकृष्ण वाघेरे82.प्रियांका सुनिल कुदळे83.हिरानंद उर्फ डब्बू किमतराम आसवानी84.मोनिका नवनाथ नढे85.उषा दिलीप काळे86.मच्छिंद्र भाऊसाहेब तापकीर87.संतोष अंकुश कोकणे88.मालिका नितीन साकळे89.विशाल नंदू बारणे90.योगिता महेश बारणे91.प्रविण रामचंद्र बारणे92.संतोष नागु बारणे93.वर्षा सचिन भोसले94.माया संतोष बारणे95.मंगेश मच्छिंद्र बारणे96.विक्रम भास्कर वाघमारे97.रेखा राजेश दर्शिले98.चित्रा संदीप पवार99.मयुर पांडुरंग कलाटे100. सुमित रघुनाथ डोळस101.अश्विनी चंद्रकांत तापकिर102.अनिता कैलास थोपटे103.सागर खंडूशेठ कोकणे104.उमेश गणेश काटे105.शितल विठ्ठल उर्फ नाना काटे106.मिनाक्षी अनिल काटे107.विठ्ठल उर्फ नाना कृष्णाजी काटे108.कुंदा गौतम डोळस109.सुनिता दिशांत कोळप110.राजू रामा लोखंडे111.तानाजी दत्तात्रय जवळकर112.राजु विश्वनाथ बनसोडे113.प्रतिक्षा राजेंद्र लांघी जवळकर114.स्वाती उर्फ माई चंद्रकांत काटे115.रोहित सुदाम काटे116.दिप्ती अंबरनाथ कांबळे117.राजेंद्र गणपत जगताप118.उमा शिवाजी पाडुळे119.अरुण श्रीपती पवार120.निशा वसंत कांबळे121.प्रसाद उत्तम शिंदे122.उज्वला सुनिल ढोरे123.अतुल अरविद शितोळे
प्रभाग क्रमांक 26
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवारराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवारराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवारराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार
हेही वाचा
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
