Suryakant Yeole Parth Pawar Land Pune :1800 कोटींची जमीन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुत्र पार्थ पवारांच्या (Parth Pawar) कंपनीने केवळ 300 कोटींमध्ये घेतली तसंच यासाठी स्टँप ड्युटी म्हणून केवळ 500 रूपये मोजल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. यानंतर पुण्याचे तहसीलदार सूरर्यकांत येवले यांचं तडकाफडकी निलंबन करण्यात आलं. अशातच आता निलंबित तहसीलदार सूरर्यकांत येवले यांना न्यायालयाने काहीसा दिलासा दिला आहे. सुर्यकांत येवलेला (Suryakant Yeole) अतिरिक्त सत्र न्यायालयाकडून अटकपुर्व जामीन मंजुर करण्यात आलाय. पुण्यातील बोपोडी मधील जमीन गैरव्यवहार प्रकरणात हा व्यवहार मंजुर करण्यात आलाय. मात्र न्यायालयाच्या (Court) या आदेशात पार्थ पवारांच्या कंपनीचा सहभाग असलेल्या मुंढवा भागातील जमिन प्रकरणाचा उल्लेख नाही. मुंढवा प्रकरणात देखील येवलेवर आरोप आहे आणि गुन्हा दाखल आहे. जामीनासाठी अर्ज करताना येवलेने तो निर्दोष असल्याचा दावा केलाय. अशातच आता तपासात सहकार्य करण्याच्या अटीवर हा अटकपुर्व जामीन देण्यात आलाय.

Continues below advertisement

Pune Police: आठ दिवस उलटूनही अटक नाही, पोलिसांना खरंच कारवाई करायची आहे का?

दरम्यान, पुणे पोलिसांनी आणि पिंपरी-चिंचवडच्या बावधन पोलिसांनी अखेरपर्यंत निलंबित तहसीलदार सूरर्यकांत येवलेंना अटक केलेली नाही. त्यामुळे त्यांना न्यायालयात अटकपूर्व जामीन मंजूर करण्याचा अर्ज मोकळा झाला. परिणामी त्यांना जामिनासाठी अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झाला आणि अखेर हा अटकपूर्व जामीन मंजूर झाला.

त्यामुळे बोपोडी जमीन प्रकरणात जे इतर आरोपी आहेत, ज्यामध्ये अमेडिया' कंपनीचे संचालक दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी इत्यादींना देखील अशाच पद्धतीने अटकपूर्व जामीन मिळण्याची दा शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांना खरंच या प्रकरणात कारवाई करायची आहे का? हा प्रश्न या निमित्याने आता उपस्थित होत आहे. कारण दोन वेगवेगळ्या प्रकरणात गुन्हे दाखल झाले असताना आणि आठ दिवस उलटून गेले असताना या प्रकरणी कुणालाही अटक झालेली नाही. त्याचाच फायदा घेऊन पुण्यातील निलंबित तहसिलदार सूर्यकांत येवलेंनी आपला अटकपूर्व जामीन न्यायालयाकडून मंजूर करून घेतला आहे.

Continues below advertisement

संबंधित बातमी: