पिंपरी चिंचवड : पुण्याच्या कामशेत इथल्या हॉटेल राजवाडामध्ये मृतावस्थेत आढळलेल्या नेहाल नानेकरची गोळ्या झाडून हत्या झाल्याचं उघड झालं आहे. रविवारच्या रात्री साडे आठ वाजता ही घटना घडली. चिंचवड येथील विकी घोलप टोळीचा तो सदस्य होता.
पुण्यात रविवारी रात्री आठच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली होती. रविवारच्या सुट्टीची मजा घेण्यासाठी नेहाल हा विकी आणि संकेत सातनकरसोबत लोणावळ्याला गेला होता. तिथून परतत असताना ते कामशेतमधील हॉटेल राजवाडा इथे थांबले. भजीची ऑर्डरही दिली, तितक्यात गोळी झाडल्याचा आवाज आला. नेहाल रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं हॉटेल कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं.
नेहालने आत्महत्या केली की त्याला कोणी गोळी मारली हे अस्पष्ट होतं. नेहालला चिंचवडमधील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
तर दुसरीकडे दोन आठवड्यापूर्वी चिंचवडमध्ये हत्या झालेल्या आकाश लांडगेच्या हत्येनंतर नेहाल डिप्रेशनमध्ये होता आणि त्यातून त्याने गोळी झाडून आत्महत्या केली, असा दावा त्याचे मित्र विकी आणि संकेतने पोलिसांसमोर केला होता.
मात्र लागलेली गोळी पाहता, विकी आणि संकेतनेच हा बनाव रचल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे. त्यामुळेच कामशेत पोलिसांनी दोघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
पिंपरीत हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळलेल्या नेहालची हत्या!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Jun 2018 10:28 AM (IST)
नेहालने आत्महत्या केली की त्याला कोणी गोळी मारली हे अस्पष्ट होतं. नेहालला चिंचवडमधील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -