पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडच्या वाकडमध्ये एकाने गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आनंद यादव असं त्यांचं नाव आहे. त्याने तणावातून हे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.


आज सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. घरात भाऊ, वहिनी असताना आनंद यादव यांनी बाथरुममध्ये जाऊन गोळी झाडली. ज्या बंदुकीतून त्यांनी गोळी झाडली ती त्यांच्या वडिलांच्या नावावर आहे.

आनंद यादवांचे वडील हे मुंबईत व्यवसाय करतात. आनंद आणि त्याचं कुटुंब वाकड इथल्या रिदम सोसायटीत राहतं. काही वर्षांपासून ते पत्नीपासून वेगळे राहत आहेत.

आनंद यादव हा आयटी इंजिनीअर होते. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात त्यांनी डिप्रेशन थेरपी देखील घेतली होती.