पिंपरी (पुणे) : कौमार्य चाचणीला विरोध करणाऱ्या ऐश्वर्या भाट-तमायचीकर यांना दांडिया खेळण्यास विरोध झाल्याचा प्रकार पिंपरीत घडला. ऐश्वर्या दांडिया खेळायला आल्याने खेळच बंद करण्यात आला. पिंपरीतल्या भाटनगर येथे हा प्रकार घडला.
खराडीत राहणारी ऐश्वर्या माहेरी आली म्हणून काल भाटनगरमधील देवीच्या दर्शनासाठी गेली होती. तेव्हा ती इतर महिलांसोबत दांडिया खेळू लागली. मात्र मंडळाने हे पाहताच दांडिया खेळ बंद केला आणि डीजे सुरु केला व केवळ तिथे उपस्थित तरुण डीजेवर नाचू लागले. ऐश्वर्या काही वेळ तिथेच थांबून राहिली. मग एका मैत्रिणीला तिने बोलावले. मैत्रिणीला तिथेच थांबवून ती पिंपरी पोलीस चौकीत गेली. ऐश्वर्या तिथून गेल्याचं पाहताच, पुन्हा दांडिया सुरू झाल्याचे मैत्रिणीने तिला कळवलं.
कौमार्य चाचणीला विरोध केल्यानेच हा प्रकार घडवून आणल्याचा आरोप ऐश्वर्याने केलाय. तसा जवाब पोलिसांना दिला असून आज दुपारपर्यंत गुन्हा दाखल होईल, अशी माहितीही ऐश्वर्याने दिली.
यंदाच जानेवारीपासून ऐश्वर्या आणि समाजातील तरुण-तरुणींनी कौमार्य चाचणी विरोधात एल्गार उभा केलाय. सोशल मिडियावर 'Stop The "V"Ritual' या नावाने ग्रुप तयार करुन, हे तरुण-तरुणी एकवटलेत.
मे महिन्यात ऐश्वर्याने स्वतःच्याच विवाहात कौमार्य चाचणीला विरोध दर्शवला. तर जून महिन्यात एका विवाहातच जात पंचायतीसमोर अशी चाचणी घेऊ नये यावर जोर धरला. तेव्हा बराच गदारोळ झाला. अशा विरोधामुळे समाजाची प्रतिमा मलिन होत असल्यानेच असा अघोषित बहिष्कार 'Stop The "V"Ritual' ग्रुपवर घातला जातोय.
कौमार्य चाचणीला विरोध करणाऱ्या ऐश्वर्याला दांडिया खेळण्यास विरोध
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Oct 2018 10:32 AM (IST)
यंदाच जानेवारीपासून ऐश्वर्या आणि समाजातील तरुण-तरुणींनी कौमार्य चाचणी विरोधात एल्गार उभा केलाय. सोशल मिडियावर 'Stop The "V"Ritual' या नावाने ग्रुप तयार करुन, हे तरुण-तरुणी एकवटलेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -