पुणे : पुण्यात पे अँड पार्कचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. शहरातील पार्किंग पॉलिसी लागू करण्यासाठी आज महापालिकेत सर्वसाधारण सभेचं आयोजन करण्यात आलं. मात्र, विरोधकांनी काहीकाळी थेट महापौरांनाच महापालिकेत प्रवेशबंदी केली होती.
पार्किंग पॉलिसीला भाजप वगळता विविध राजकीय पक्ष, संघटना, स्वयंसेवी संस्थांचा विरोध सुरु आहे. आज याच विषयावर सर्वसाधारण सभा असल्याने महापालिकेबाहेर जोरदार आंदोलन सुरु होती. सुरक्षेचा विचार करुन सुरक्षारक्षकांनी महापालिकेची प्रवेशद्वारं बंद केली होती.
महापालिकेचं गेट बंद केल्याने महापौर मुक्ता टिळक यांना काही काळ ताटकळत उभं राहावं लागलं. तर सर्वसाधारण सभेचं कामकाज सुरु होताच शिवसेना नगरसेवकांनी काळे शर्ट आणि काऴ्या टोप्या घालून पे अॅन्ड पार्कच्या धोरणाला विरोध दर्शवला.
विरोधकांमुळे पुणे महापालिकेचं गेट बंद, महापौर ताटकळत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Mar 2018 05:37 PM (IST)
पार्किंग पॉलिसीला भाजप वगळता विविध राजकीय पक्ष, संघटना, स्वयंसेवी संस्थांचा विरोध सुरु आहे. आज याच विषयावर सर्वसाधारण सभा असल्याने महापालिकेबाहेर जोरदार आंदोलन सुरु होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -