पुणे :  पुण्यात आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची महामुलाखत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली. या मुलाखतीत राज ठाकरेंच्या तुफान प्रश्नांना शरद पवारांनी सडेतोड उत्तरं दिली. बोट धरुन राजकारणात आलो हे मोदींचं वक्तव्य कसं खोटं होतं, मराठी नेत्यांविरोधात दिल्लीतली लॉबीशिवाय मोदींनी गांधी कुटुंबावर केलेला व्यक्तीगत हल्ला यावर शरद पवारांनी थेट टीका केली.

याशिवाय मराठीचे कडवट संस्कार करा म्हणजे जातीय तणाव कमी होतील. असा सल्ला पवारांनी दिला. त्याचबरोबर छत्रपती शिवराय हे कोणत्याही एका जातीचे नसल्याचंही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, या मुलाखतीच्या शेवटाला राज ठाकरेंनी रॅपिड फायर राऊंड घेत काही झटपट प्रश्न शरद पवारांना विचारले. यातील शेवटच्या प्रश्नाने सर्वच उपस्थितींना बुचकाळ्यात पाडलं. यावेळी राज ठाकरेंनी शरद पवारांना विचारलं की, ‘ राज की उद्धव?’, यावर पवारांनी आपल्याच स्टाईलमध्ये उत्तर दिलं. ‘ठाकरे कुटुंब...’

पुण्यातल्या बीएमसीसी महाविद्यालयाच्या मैदानावर ही अनोखी मुलाखत पार पडली. ही महामुलाखत ऐकण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती.

शरद पवारांची प्रकट मुलाखत... मुलाखतकार राज ठाकरे!



मी आरोपांना फार महत्त्व देत नाही. आरोपांमध्ये यत्किंचितही तथ्य नसेल तर स्पष्टीकरण देण्याची गरज नाही : शरद पवार

आपल्यावर अनेक आरोप झाले, पण तुम्ही त्याचं स्पष्टीकरण देत नाही : राज ठाकरे

मला पंढरीत विठ्ठल, कोल्हापुरात अंबाबाईचं दर्शन घ्यायला मला आवडतं. बरं वाटतं. : राज ठाकरे  

राजकीय आयुष्यात कधी देव आठवलाय का? : शरद पवार

बरं मग? : शरद पवार  

मला असं कळलं की तुम्ही देव मानत नाही. : राज ठाकरे  

आयुष्यातील अशी कोणती घटना बदलावीशी वाटते? : राज ठाकरे

यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जाण्याने अस्वस्थ झालो : शरद पवार

कोणत्या नेत्याच्या जाणाने तुम्हाला सर्वाधिक दु:ख झालं? : राज ठाकरे

ज्यामधलं आपल्याला समजत नाही ते समजून घेण्याचा राहुल गांधींचा सध्या प्रयत्न सुरु आहे : शरद पवार

जुनी काँग्रेस आणि आताची काँग्रेस यामध्ये प्रचंड फरक : शरद पवार

काँग्रेसचं भविष्य काय वाटतं आणि राहुल गांधींबाबत तुमचं मत काय? : राज ठाकरे

मोदी सकाळी लवकर उठतात, प्रचंड काम करण्याची त्यांची क्षमता आहे, कष्ट करण्याची ताकद आहे ही त्यांची जमेची बाजू आहे : शरद पवार 

नरेंद्र मोदींबाबत पूर्वी काय मत होतं आणि आता काय मत आहे? : राज ठाकरे 

मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न सुरु आहे एवढं नक्की : शरद पवार  


इथून अहमदाबादमध्ये कोणी जाणार नाही, पण तिथूनच लोकं मुंबईत येतील : शरद पवार 

मुंबई बाजूला करण्याचं षडयंत्र आहे का?, बुलेट ट्रेन गरज नाही तरी प्रकल्प आणत आहेत : राज ठाकरे

सर्व जुन्या क्रिकेटर्संना मी 50 हजार रुपये पेन्शन सुरु केली : शरद पवार


आपलं पंतप्रधान होण्याचं स्वप्न आजही आहे, देशाला मराठी पंतप्रधान मिळाल्यास मला सर्वाधिक आनंद होईल : राज ठाकरे


अनेक मुख्यमंत्री विदर्भातून आले आहेत तरीही स्वतंत्र विदर्भाची मागणी का केली जाते? : राज ठाकरे 

संसदेत चर्चा झाली पण वैयक्तिक चर्चा झाली नाही : शरद पवार 

शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत काही चर्चा झाली तुमच्या दिल्लीतील शिष्याशी? : राज ठाकरे

मी कृषीमंत्री असताना कॅबिनेटमध्ये सांगितलं धाडस करु,कर्जमाफी देऊ, 71 हजार कोटी कर्जमाफी दिली : शरद पवार

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी आम्ही काही ठोस पावलं उचलली, त्यामुळे पुढील तीन वर्षात शेतकऱ्यांचं आत्महत्यांचं प्रमाण कमी झालं : शरद पवार 

शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा थांबवता येतील? : राज ठाकरे

यापुढे जातीयदृष्ट्या आरक्षण देऊ नये, जे आर्थिकदृष्ट्या मागास आहे त्यांनाच आरक्षण मिळालं पाहिजे : शरद पवार

छत्रपती शिवाजी महाराज : शरद पवार  

बंगाली माणूस टागोरांमुळे एकत्र येतो, पंजाबी लोक गुरुनानक यांचं नाव घेतलं की एकत्र येतात, मराठी माणसाला असा कुठला हुक एकत्र बांधू शकेल? : राज ठाकरे 

बाळासाहेबांनी कधी जात पाहिली नाही, कर्तृत्व पाहिलं : शरद पवार 

जात नाही, कर्तृत्व बघा, असा बाळासाहेबांचा संदेश, चंद्रकांत खैरेंसारखी व्यक्ती जातीधर्मापलिकडे जाऊन बाळासाहेबांनी पाहिली : शरद पवार

जाती-जातीमध्ये आलेला कडवटपणा दूर करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे : राज ठाकरे

प्रत्येक महापुरुषाकडे काही जण जात म्हणून पाहतात, ते बदलावंसं वाटत नाही का? : राज ठाकरे

शिवाजी पार्कमध्ये एकत्र आलेले पवार, बाळासाहेब आणि जॉर्ज फर्नांडिस पुढे एकत्र राहतील, असं वाटलं होतं का? : राज ठाकरे

नरसिंह राव मला म्हणाले ज्या महाराष्ट्राने तुम्हांला मोठं केलं, तीनदा मुख्यमंत्री केलं, ते राज्य जळत असताना तुम्ही महाराष्ट्रात जाणार नाही? हे ऐकल्यावर मी अस्वस्थ झालो आणि राज्यात परत आलो : शरद पवार

दंगलीनंतर मुंबई पेटल्याचा संदेश जगभरात गेल्यास भांडवलाच्या दृष्टीने चिंताजनक ठरेल : शरद पवार

मुंबई दंगलीनंतर तुम्ही मुख्यमंत्री म्हणून राज्यात परत आलात. त्यावेळी नरसिंहराव आणि तुमच्यात काय चर्चा झाली होती? : राज ठाकरे 

समोरच्या व्यक्तीचा सन्मान ठेवत राजकारण करायला हवं : शरद पवार

बाळासाहेबांनी माझ्यावर अनेकदा जाहीर टीका केली, पण त्यांनी वैयक्तिक सलोखा कधीच सोडला नाही : शरद पवार 

तुमचा शिष्य तुमचं ऐकतो का : राज ठाकरे

गुजरातचा अभिमान जरुर ठेवा, पण तुम्ही देशाचे प्रमुख आहात हे लक्षात ठेवा : शरद पवार

महाराष्ट्र देशाचा विचार करतो, मात्र इतर राज्य आपापला विचार करतात, त्यामुळे महाराष्ट्र आणि मराठीचं नुकसान झालंय का? : राज ठाकरे

महाराष्ट्र देशाचा विचार करतो, पण इतर राज्य देशाचा विचार करत नाहीत : राज ठाकरे 

राष्ट्राचा विचार प्रथम करतो, राज्याचा विचार नंतर : शरद पवार

महाराष्ट्रापेक्षा नेहरु मोठे आहेत, असं यशवंतराव चव्हाण म्हणाले होते, आपलं मत काय? : राज ठाकरे

चुकीचं धोरण असेल तर टीका करावी पण आपल्या पदाचा भान ठेऊन वक्तव्य करावं : शरद पवार

यशवंतराव चव्हाणांच्या काळातील मूल्याधिष्ठित राजकारण आजच्या काळात का दिसत नाही? : राज ठाकरे

राजकारणात खरंच बोलावं लागतं : शरद पवार

खरं बोलल्याचा कधी त्रास झालाय का? राज ठाकरे यांचा पहिला प्रश्न

- मी हळूहळू महाविद्यालय ताब्यात घेण्याचं काम सवयीप्रमाणे सुरु केलं : शरद पवार

- महाराष्ट्राला पडलेले, देशाला पडलेले प्रश्न मी पवार साहेबांना विचारणार आहे :  राज ठाकरे 

- मी नेहमीचे प्रश्न पवार साहेबांना प्रश्न विचारणार नाही, महाराष्ट्राला पडलेले प्रश्न मी विचारेन : राज ठाकरे

- बाबासाहेब पुरंदरेंची मुलाखत घेतली होती, त्यानंतर पहिल्यांदाच इतक्या प्रेक्षकांच्या उपस्थितीत मुलाखत : राज ठाकरे

- मला भाषणाच्या वेळीही कधी एवढं प्रेशर आलं नव्हतं. तेवढं प्रेशर आता मला आलं आहे. : राज ठाकरे 



LIVE UPDATE :

- कला, साहित्य, क्रीडा या सर्वच क्षेत्रात पवारांचा वावर - सुशीलकुमार शिंदे 

- शरद पवार खिलाडू वृत्तीचे, खेळकर आणि तितकेच विनोदीही आहेत - सुशीलकुमार शिंदे

- शरद पवारांचा कॉलेजमध्ये जसा खोडकरपणा होता तसाच आजही खोडकरपणा आहे - सुशीलकुमार शिंदे 

- शरद पवारांनी नेहमीच सेक्युलर विचारांचा वसा घेतला : सुशीलकुमार शिंदे

- खरं म्हणजे मी राज ठाकरेंच्या कानात सांगितलं होतं की, पण राज ठाकरे विचारतील की नाही. म्हणून मीच विचारतो... माझे राजकीय गुरु आणि मी त्यांचा शिष्य. एका शिष्याच्या हातून गुरुचा सत्कार आणखी काय हवं असतं राजकीय कारकीर्दीत.. - सुशीलकुमार शिंदे 

- ज्या कॉलेजमधून पवार साहेबांचं नेतृत्व फुललं. तिथेच आज पवार साहेबांचा सत्कार होत आहे -  सुशीलकुमार शिंदे 

- सुशीलकुमार शिंदे यांचं भाषण सुरु

- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते सन्मान 

- राज्यातील काही प्रगतशील आणि प्रयोगशील शेतकऱ्यांचा शरद पवार यांच्या हस्ते सन्मान

- ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जागतिक मराठी अकादमीचा जीवनगौरव बहाल, शरद पवार यांच्या हस्ते सन्मान

- बीव्हीजेचे सर्वेसर्वा हणमंतराव गायकवाड यांचा शरद पवार यांच्या हस्ते सन्मान

- डॉ. पी डी पाटील यांचा शरद पवार यांच्या हस्ते सन्मान

- शैक्षणिक क्षेत्रात मोलाची कामगिरी करणाऱ्या भारती विद्यापीठाचा शरद पवार यांच्या हस्ते सन्मान 

- संदीप वासलेकर यांचा शरद पवार यांच्या हस्ते सन्मान

- ज्येष्ठ क्रिकेटर चंदू बोर्डे यांचा शरद पवार यांच्या हस्ते सन्मान

- ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे (कासव चित्रपट) यांचा शरद पवार यांच्या हस्ते सन्मान

- दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा शरद पवार यांच्या हस्ते सन्मान

- सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगना लीला गांधी यांचा शरद पवार यांच्या हस्ते सन्मान 

'शोध मराठी मनाचा' या संमेलनाच्या निमित्ताने ही खुमासदार मुलाखत विनामूल्य पाहायला मिळणार आहे. यावेळी शरद पवार यांच्या 50 वर्षांच्या राजकीय, सामाजिक, कृषी, क्रीडा आणि सांस्कृतिक प्रवासाचा सन्मान माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
LIVE VIDEO :



सुरुवातीला ही मुलाखत 3 जानेवारी 2018 ला आयोजित करण्यात आली होती.  पण 1 जानेवारीला कोरेगाव-भीमा प्रकरणामुळे ही आयोजित मुलाखत पुढे ढकलण्यात आली होती. अखेर 21 फेब्रुवारीचा मुहूर्त या मुलाखतीसाठी निश्चित करण्यात आला. त्यामुळे या बहुप्रतीक्षित मुलाखतीला दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, या मुलाखतीवेळी शरद पवारांच्या ५० वर्षांचा राजकीय आणि सामाजिक प्रवास राज ठाकरे आपल्या प्रश्नांच्या माध्यमातून उलगडणार आहेत. एबीपी माझावर या मुलाखतीचं थेट प्रक्षेपण तुम्ही पाहू शकणार आहात.