पुणे : पुण्यातील मुंढवा परिसरातील जमीन (Pune Land Dispute) गैरव्यवहार प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने हा व्यवहार रद्द करण्यासाठी ४२ कोटींचे मुद्रांक शुल्क भरण्यासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ मागितल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी कायदेशीरदृष्ट्या बाजू मांडण्यासाठी अमेडीया (Pune Land Dispute) कंपनीकडून तब्बल १० वकिलांची फौज तैनात करण्यात आल्याची माहिती आहे. याबाबत आज (मंगळवारी) निर्णय घेतला जाणार आहे. मुंढवा येथील बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाची चाळीस एकर जमीन (Pune Land Dispute) पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने परस्पर खरेदी केल्यानंतर या जागेच्या गैरव्यवहारानंतर राज्यातील राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणावर तापलं होतं. अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात आली होती.(Pune Land Dispute)
Pune Land Dispute: मुदत संपली असून आज यावर निर्णय होणार असल्याची माहिती
त्यानंतर हा जमीन व्यवहार रद्द करण्यात येत असल्याचं जाहीर करण्यात आलं, त्यानंतर मुद्रांक शुल्क आणि नोंदणी विभागाने कंपनीला पहिली नोटीस ४२ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरण्यासाठी ७ नोव्हेंबरला बजावली होती. या नोटिसीला उत्तर देण्यासाठी १६ नोव्हेंबरची मुदत देण्यात आली होती. मात्र, ही मुदत पंधरा दिवस वाढवून द्यावी, असा अर्ज कंपनीने १४ नोव्हेंबरला नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडे केला होता. त्यानंतर मुद्रांक शुल्क आणि नोंदणी विभागाने आठ दिवसांची मुदतवाढ देऊन २४ नोव्हेंबरपर्यंत ४२ कोटींचे मुद्रांक शुल्क भरण्याबाबतची नोटीस जारी केली होती. काल (सोमवारी, ता २४) ही मुदत संपली असून आज यावर निर्णय होणार असल्याची माहिती आहे.
Pune Land Dispute: सह जिल्हा निबंधक यांच्याकडे केला अर्ज
अमेडिया कंपनीला बुडविलेले मुद्रांक शुल्क भरण्यासाठी याआधीही मुदतवाढ देण्यात आली आहे. आता पुन्हा एकदा कंपनीने पंधरा दिवसांची मुदत वाढवून देण्याबाबतचा अर्ज मुद्रांक शुल्क विभागाचे सह जिल्हा निबंधक यांच्याकडे दिला आहे. या जमीन व्यवहारप्रकरणी ४२ कोटी मुद्रांक शुल्क भरावेच लागणार आहे, अशी माहिती मुद्रांक शुल्क आणि नोंदणी विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Pune Land Dispute: सोमवारच्या सुनावणीला शीतल तेजवानींची दुसऱ्यांदा गैरहजेरी
पुण्यातील पार्थ पवार यांच्या जमीन गैर व्यवहार प्रकरणी काल (सोमवारी) पार पडलेल्या सुनावणीला शीतल तेजवानी यांची दुसऱ्यांदा गैरहजेरी लावली. तेजवानी यांच्यासाठी वकील दिपाली केदार यांच्याकडून १ आठवड्याची हजर होण्यासाठी मुदत मागण्यात आली आहे, शीतल तेजवानी यांना खारगे समितीसमोर हजर होण्यासाठी ४ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी दिग्विजय पाटील यांना मुदतवाढ देण्यात आली आहे आणि आता शीतल तेजवानीला देखील दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे,पाटील, तेजवानी यांना मुदतवाढ दिल्यामुळे खारगे समितीचा अहवाल येण्यासाठी आणखी १५ दिवस लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.