पुणे : पुण्याच्या संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरींच्या पुतळ्याचा भाग नदीपात्रात सापडला आहे. पोलिसांनी आरोपींना मुळा-मुठा नदीच्या पात्राजवळ नेल्यानंतर हा भाग सापडला.

पुण्याच्या संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरींचा पुतळा हटवणाऱ्या चौघांना 6 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. हर्षवर्धन मगदूम, प्रदीप कणसे, स्वनिल काळे, गणेश कारले अशी आरोपींची नावं आहेत. हे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते असल्याचं सांगण्यात येतं.

गडकरींचा पुतळा बसवेपर्यंत पुण्यात प्रयोग नाही : पुष्कर श्रोत्री


गडकरींचा पुतळा हटवतानाची दृश्यं सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. ही दृश्यं एबीपी माझाच्या हाती लागली आहेत. सोमवारी मध्यरात्री चार तरुण पुतळा हटवताना यात स्पष्टपणे दिसून येत आहेत. संभाजी ब्रिगेडनं या कृत्याची जबाबदारी स्वीकारली होती.

राम गडकरींचा पुतळा हटवला

नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुण्याच्या संभाजी उद्यानातील पुतळा हटवण्यात आला. ‘राजसंन्यास’ या नाटकातून राम गणेश गडकरींनी  छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. यातील मजकूर खटकल्याने संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी रात्री अडीचच्या सुमारास पुतळा हटवला आणि शेजारुन वाहणाऱ्या मुठा नदीत फेकून दिल्याचं म्हटलं जात आहे.

संबंधित बातम्या


राम गडकरींचा पुतळा हटवला, कोणाची काय प्रतिक्रिया?


नाटककार राम गणेश गडकरींचा पुतळा संभाजी ब्रिगेडने हटवला!


गडकरींचा पुतळा हटवणारे सीसीटीव्हीत कैद