संस्थेची विश्रांतवाडीमध्ये जनता हायस्कूल नावाची शाळा आहे. या शाळेत शिक्षकांची कमतरता असल्यामुळे मुख्याध्यापिकांनी पाटील यांना गेस्ट लेक्चरसाठी नेमले होते.
पाटील लेक्चरसाठी शाळेमध्ये आले असता अंथनी ननावरे आणि त्यांच्या मुलीने त्यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली. राग अनावर झालेल्या मुलीने पाटील यांना थेट चपलेने मारहाण करायला सुरुवात केल्याने शाळेत गोंधळ उडाला.
या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांत मुलीच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाहा व्हिडीओ