लग्नाच्या नोंदणीसाठी विवाह नोंदणी कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही, अशी माहिती राज्याचे मुद्रांक शुल्क आणि नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे यांनी दिली. विवाह नोंदणीची सर्व प्रक्रिया ऑनलाईन केल्यानं सोईच्या ठिकाणाहून संबंधित व्यक्तीला नोंदणीसाठी नोटीस देता येणार आहे.
पूर्वी वधू-वरांना नोटीस देणे आणि 30 दिवसानंतर विवाह संपन्न करणे अशा कामासाठी वेळ जात होता. आता प्रक्रिया 1 नोव्हेंबरपासून ऑनलाईन केल्याने संबंधित जोडप्याचा आणि अधिकाऱ्यांचा वेळ वाचणार आहे.