पुणे : पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाच्या 2 हजार 503 सदनिका आणि 67 भुखंडांसाठी 16 डिसेंबर रोजी ऑनलाईन सोडत होणार आहे. पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथील बॉक्सिंग हॉलमध्ये ही सोडत होणार असून सोडतीचं थेट प्रेक्षपण म्हाडा लॉटरीच्या वेबसाईटवर होईल.
पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली.
पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे 2 हजार 503 सदनिका आणि 67 भूखंडाच्या विक्रीसाठी 5 डिसेंबर रोजी जाहिरात देण्यात आली होती. या जाहिरातीस अनुसरुन अंदाजे 31 हजार नागरिकांनी रक्कम भरुन सोडतीसाठी सहभाग नोंदवला आहे.
विजेत्या लाभार्थ्यांची आणि प्रतिक्षा यादी सोडतीच्या ठिकाणी, म्हाडा पुणे विभागीय कार्यालय आणि म्हाडाच्या वेबसाईटवर सायंकाळी 6 वाजता प्रसिध्द करण्यात येणार आहे.