चितळे बंधू मिठाईवाले यांचे उकडीचे मोदक, नऊ वेगवेगळ्या चवींचे मोदक हे ग्राहकांमध्ये आजपर्यंत प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर यंदा चितळेंनी गणरायासाठी खास ‘सुवर्ण मोदक’ तयार केला आहे. त्याचबरोबर चंदेरी मोदकही उपलब्ध आहे. सोन्याचे व चांदीचे आवरण असणारा हा मोदक चितळेंच्या डेक्कन येथील शाखेत ऑर्डरनुसार तयार करुन दिला जातो.
गणरायाच्या नैवेद्यासाठी आणलेला हा आगळावेगळा मोदक यंदा सर्व खवय्यांसाठी नक्कीच विशेष आकर्षण ठरणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात सर्वत्र पसरलेला उत्साह, गजबजलेल्या बाजारपेठा असे अत्यंत सुखकारी आणि मांगल्यमयी वातावरण आहे. या वातावरणात बाप्पासाठीचे नैवेद्य हा खवय्यांसाठी खास आकर्षणाचा विषय आहे. उकडीचे मोदक, तळणीचे मोदक असे मोदकांचे नानाविध प्रकार आपल्याला बाजारपेठात दिसतात. आता त्यात ‘सुवर्ण मोदक’ या अतिशय आकर्षक प्रकाराची भर पडली असून खवय्यांना तो नक्की आवडेल, असा विश्वास चितळे बंधू मिठाईवाले यांनी व्यक्त केल