पुणे : पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या हद्दीवरील नीरा नदीच्या पात्रात दुधाचा कंटेनर पडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. शिवापूर टोलनाका पार केल्यानंतर कंटेनरचा थांगपत्ता लागत नसल्यामुळे सर्वत्र शोध सुरु आहे.


सातारमधील शेळके ट्रान्सपोर्टचा कंटेनर नऊ जानेवारीला पुण्याहुन सातारच्या दिशेने निघाला होता. या कंटेनरने पुणे-सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर टोलनाका पार केल्याचं टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. परंतु त्यानंतर या कंटेनरचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही.

त्याचबरोबर कंटेनरचा ड्रायव्हर आणि क्लीनर यांचेही मोबाईल फोन तेव्हापासुन बंद आहेत. कंटेनरला GPS यंत्रणा होती, नीरा नदीवर असलेल्या पुलाचा कठडा तुटलेला आढळल्याने कंटेनर नदीच्या पात्रात पडला असावा, अशी भीती व्यक्त होत आहे.

अडीच वर्षांपूर्वी याच ठिकाणी एक कार नदीत पडून दोन जणांचा मृत्यू झाला होता. चुकीचे वळण, जुने झालेले कठडे आणि नव्या आणि जुन्या पुलाच्या मध्ये असलेलं अंतर यामुळे हा भाग वाहतुकीसाठी धोकादायक समजला जातो.