पुणे : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी पुण्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी तसेच कचरामुक्त पुणे करण्यासाठी उपाय सुचवले आहेत. पुण्यात प्रदूषण वाढले आहे. त्यामुळे पुणे अजून वाढवू नका,पुण्याला मोकळा श्वास घेऊ द्या, असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले आहे. पुण्याला जुने दिवस आणा, पुण्याला प्रदूषणापासून मुक्त करा, अशी विनंती देखील नितिन गडकरी यांनी अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांनी या वेळी केली आहे.
नितीन गडकरी म्हणाले, पुणे आता अधिक वाढवू नका. पुणे प्रदूषित करु नका. मी लहान असताना माझ्या बहिणीकडे स्वारगेटला रहायला यायचो तेव्हा पर्वतीवरुन गार हवा येत होती. परंतु आता ही हवा हरवली आहे. पुणे सर्वाधिक प्रदूषित शहर झाले आहे. यामुळे आता पुणे अधिक वाढवू नका. पुणे प्रदूषीत करु नका.
पुण्यातून पेट्रोल डिझेल हद्दपार करा
पुण्याला पेट्रोल,डिझेलपासून मुक्त केले तर चाळीस टक्के प्रदूषण कमी होईल. त्यासाठी इथेनॉल, मिथेनॉल आणि हायड्रोजन याचा वापर वाढवा. मला भारतातून पेट्रोल आणि डिझेल हद्दपार करायचे आहे. इथेनॉल, मिथेनॉल आणि हायड्रोजन याचा वापर वाढवा. हायड्रोजन हे भविष्य आहे. कचऱ्यापासून वीजनिर्मिती करू नका, ग्रीन हायड्रोजनचा वापक करा. मी स्वत: दिल्लीत हायड्रोजनवर चालणारी कार वापरतो.
मंत्र्यांच्या ताफ्यात असणारे सायरन बंद करणार
मंत्र्यांच्या ताफ्यात असणाऱ्या वाहनांचे सायरन काढणार असल्याची घोषणा नितीन गडकरी यांनी केलीये. लवकरच कर्णकर्कश हाॅर्न ऐवजी मधूर आणि सुरेल भारतीय वाद्यांच्या आवाजाचे हॉर्न बसवण्यात येणार आहे.
पुण्यातील कचऱ्याचा उपयोग रिंग रोड तयार करण्यासाठी करा
पुण्यातील वाढत्या लोकसंख्येबरोबर कचऱ्याची देखील मोठी समस्या आहे. पुण्यातील कचऱ्याचा उपयोग रिंग रोड तयार करण्यासाठी वापरला तर पुण्यात कचरा उरणार नाही. आम्ही आमचे टॉयलेटचे पाणी विकून 300 कोटी रुपये कमावतो. मी पन्नास हजार कोटीत पुण्याचे सर्व उड्डाणपूल बांधून द्यायला तयार आहे, असेही नितीन गडकरी म्हणाले.
चांदणी चौकाचे नाव दोन दादांनी मिळून ठरवा, मी मान्यता देईल
नितीन गडकरी म्हणाले, पुण्याला बडल इंजिन लागले. दोन दादा एकत्र आले आहेत. आमचे डिपार्टमेंट वेळेत भ्रष्टाचारमुक्त आणि काम पूर्ण करण्यासाठी ओळखले जाते.म्हणून मी ठेकेदारांना देखील तंबी देतो. चांदणी चौकाचे नाव जे काही आहे ते अजित पवार आणि चंद्रकांत पाटलांनी मिळून ठरवावे,मी त्याला मान्यता देईल.
हे ही वाचा :
पुण्याच्या वाहतूक कोंंडीवर गडकरींचा रामबाण उपाय; सुरु होणार हवेतून चालणाऱ्या बसेस