पुणे : कोथरूड परिसरातील नव्याने बांधलेल्या इमारतीतील तब्बल दहा सदनिका जबरदस्तीने ताब्यात घेतल्याप्रकरणी कुख्यात गुंड नीलेश घायवळ (Nilesh Ghaywal), त्याचा भाऊ आणि पिस्तूल परवान्यावरून चर्चेत आलेला सचिन घायवळ (Sachin Ghaywal), तसेच आणखी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या पंधरा दिवसांत नीलेश घायवळवर दाखल झालेला हा पाचवा गुन्हा असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, नीलेश घायवळ (Nilesh Ghaywal) सध्या परदेशात असून त्याचे शेवटचे लोकेशन लंडन येथे आढळल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. पोलिसांनी पुणे आणि जामखेड येथील त्याच्या राहत्या घरांवर छापे टाकले असून, त्याचे नातेवाईक आणि सहकारी यांचा शोध घेतला जात आहे. मात्र, सर्वजण सध्या फरारी असल्याचे समजते.या प्रकरणात एका व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीवरून कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदनिकांवर जबरदस्तीने कब्जा घेण्याचा हा प्रकार २०२२ ते २०२३ दरम्यान घडल्याचे तपासातून समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला असून, याबाबत पुण्याचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी माहिती दिली आहे.(Nilesh Ghaywal)

Continues below advertisement

DCP Sambhaji Kadam: म्हणूनच त्याचा शस्त्र परवाना नाकारला होता....

डोक्यावर पिस्तूल लावून खंडणी मागितली त्याप्रकरणी घायवळ बंधूंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन घायवळ स्वतःला शिक्षक म्हणून घेतात, शिक्षकाच्या हातात पेन पाहिजे बंदूक नाही. घायवळ बंधू अनेक गुणांमध्ये सोबत होते ,सचिन घायवळ सुद्धा या टोळीचा सदस्य आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. म्हणूनच त्याचा शस्त्र परवाना नाकारलं होतं. गृहराज्य मंत्र्यांना देखील आम्ही हे पुरावे पाठवले होते. 

DCP Sambhaji Kadam: डोक्याला पिस्तूल लावून त्याला धमकावले

पुणे पोलिसांनी घायवळ कुटुंबियांच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली आहे. निलेश घायवळसह सचिन घायवळवर कोथरूड पोलिस ठाण्यात एका बांधकाम व्यावसायिकाला खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील कोथरूड स्थित असलेल्या एका बांधकाम व्यायसायिकाला त्याच्या सदनिकेतील १० फ्लॅट बळकावून त्याचे भाडे वसूल केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या व्यावसायिकाने जेव्हा या गोष्टीला विरोध केला तेव्हा घायवळ आणि त्याच्या इतर साथीदारांनी त्याच्या डोक्याला पिस्तूल लावून त्याला धमकावले. ही सर्व घटना २०१८ पासून आत्तापर्यंत सुरू असल्याची तक्रार फिर्यादी यांनी त्यांच्या फिर्यादीत म्हटली आहे.  

Continues below advertisement

Nilesh Ghaywal: दहा सदनिकांचा जबरदस्तीने खंडणी स्वरूपात ताबा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारांकडून कोथरूड भागात एका इमारतीचे काम सुरू होते. तेव्हा आरोपींनी त्यांना तेथे जाऊन धमकावले. 'नीलेश घायवळच्या परवानगीशिवाय येथे काहीही होऊ शकत नाही,' अशी धमकी देऊन तक्रारदारांचे बांधकाम अडवलं. नंतर सदनिकांची मागणी केली. तक्रारदारांनी तेव्हा तक्रार दिली नाही. पण, बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आरोपींनी याच इमारतीमधील दहा सदनिकांचा जबरदस्तीने खंडणी स्वरूपात ताबा घेतला. या सदनिका भाड्याने इतर व्यक्तींना दिल्या. या सदनिकांचे भाडे घेऊन ते नीलेश घायवळला देत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईनंतर नीलेश घायवळविरोधात तक्रार करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर ही तक्रार पुणे पोलिसांकडे प्राप्त झाली आहे. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंद केला आहे.